कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर हॉटेल चालकांनी कोणती काळजी घ्यावी?

Pandharpur Live -
कोरोनाच्या संकटामुळे सध्या सर्वच क्षेत्रात काम करताना काळजी घेणं अत्यावश्यक बनलंय. विविध व्यावसायिकांनी शासकीय नियमांचे पालन करुन व आवश्यक ती खबरदारी घेवून व्यवसाय करणं सोयिस्कर व सुरक्षीत ठरणार आहे. हॉटेल चालकांनी या काळात कोणती काळजी घ्यायला हवी? याबाबत पुणे येथील ऊमेश परदेशी यांनी पंढरपूर लाईव्हच्या माध्यमातून दिलेली माहिती. 
Adv. तुमच्या कल्पनेतील ’अद्ययावत शाळा’ कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर; प्रवेश सुरु!

  
(1) मोठे गार्डन रेस्टॉरंट सुरू करतांना मॅनेजमेंट ने पार्किंग मध्ये एक सॅनेटायझर केबीन (एंट्री आणि एक्झिट) बनवून घ्यावी.

(2) सॅनेटायझर केबीन रेस्टॉरंट /हॉटेलमध्ये येणार्‍या प्रत्येकाला ज्यात सिक्युरिटी गार्ड, मालक, चालक, मॅनेजर, मॅनेजमेंट चे सर्व कर्मचारी, साफसफाई कामगार, सर्व सप्लायर्सना, आणि सर्व ग्राहक या सॅनेटायझर केबिनमधूनच हॉटेल रेस्टॉरंट मध्ये दाखल होतील असे करणे आवश्यक आहे.

(3) पार्किंग लॉट मधील येणार्‍या प्रत्येक वाहनाला सॅनेटायझर स्प्रे मारण्यासाठी एका खास व्यक्तीची नेमणूक करावी.

(4) वाहन स्प्रे केल्याने पार्किंग लॉट मधील प्रत्येक वाहन निर्जंतुक होईल.

(5) रेस्टॉरंट/हॉटेल च्या प्रमुख प्रवेश द्वारात सॅनेटायझर स्प्रे च्या बाटल्या ठेवण्यात याव्यात, जेणेकरून रेस्टॉरंट, हॉटेलमध्ये दाखल होणार्‍या प्रत्येक व्यक्तीने स्वतः सॅनेटाईज होऊनच प्रवेश घेणे बंधनकारक करावे.

(6) मुख्य प्रवेशद्वारावर स्त्री /पुरुष यांना थर्मल स्क्रीन मीटर द्वारे चेक करूनच आत सोडण्यात यावे, जर कुणाचेही टेंपरेचर जास्त असेल तर त्वरित त्या व्यक्तीला  आणि त्या व्यक्तिच्या कुटूंबाला प्रवेश नाकारण्यात यावा. कारण त्यामुळे इतरांना त्रास होऊ नये म्हणून सावधानी बाळगण्यासाठी असे करणे गरजेचे असल्याचे दिसत आहे.

अजूनही बरेच मुद्दे आहेत जसे की आत गेल्यावर रेस्टॉरंट मध्ये बसताना घेण्याची काळजी, वगैरे..



Post a Comment

0 Comments