उद्योजक अभिजीत पाटील यांची सोलापूर जिल्हा ट्रॅक्टर डिलर असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड




Pandharpur Live- 
सोलापूर जिल्ह्यातील सर्व ट्रॅक्टर कपंन्याचे डिलर असोसिएशनची आज बार्शी येथे मिटींग पार पडली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील सर्व डिलरच्या वतीने अध्यक्ष अभिजीत पाटील यांची निवड करण्यात आली.
Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019


कोरोनाच्या संकट देशासह महाराष्ट्रात असल्याने आर्थिक संकटात सपडलेल्या सर्व डिलरच्या अडीआडचणीचे प्रश्न मार्गी लावण्यावर भर दिला जाईल. तसेच आरटीओ च्या नियमाचे पालन करून ट्रॅक्टर विक्री करण्यात येईल.

शेतकऱ्यांच्या हिताचे काम करण्याचा हेतू असेल, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल माझा शेतकरी समृद्ध होईल याचा विचार केला जाईल असे अभिजीत पाटील म्हणाले. यावेळी उपाध्यक्ष किरण रणशिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे, सचिव शिवशंकर पाटील यांची निवड करण्यात आली.

उपाध्यक्ष किरण रणसिंग,अजित मिरगणे,नागेश बोबडे, सचिव शिवशंकर पाटील यांची निवड करण्यात आली. यावेळी सोलापूर जिल्ह्यातील डिलर्स संतोष ठोंबरे,प्रवीण कसपटे,सतीश जाजू, विनोद कोरटकर,गणेश तोंडले,विठ्ठल कोळवले, संजय पारसवार,अजय राजानी,औदुंबर देशमुख, बी एस शुक्ला,अविनाश बागमार,अक्षय गुंड, राहुल कोंढारे,संजय मेटकरी,रामभाऊ रांखुडे आदी उपस्थित होते.