Pandharpur Live- आज रविवार दि. 5 जुलै रोजी पंढरपूरमध्ये एकही नविन कोरोना रुग्ण आढळला नाही. दि. 3 जुलै रोजी घेतलेल्या स्वॅबपैकी 53 जणांचा अहवाल आज प्राप्त झाला असुन ते सर्व निगेटिव्ह आले आहेत. अद्याप 71 अहवाल प्रलंबित आहेत. अशी माहिती पंचायत समिती चे पंढरपूर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019
आज आज रविवार दि. 5 जुलै रोजी पंढरपूर तालुक्यातील 52 जणांचे कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्याने पंढरपुरकरांना दिलासा मिळाला आहे. परंतु सोलापूर जिल्ह्यातील इतर तालुक्यात आज 12 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळुन आले आहेत. सोलापूर ग्रामीणमध्ये आजतागायत बाधितांची संख्या 531 एवढी झाली असुन आजपर्यंत 25 जणांचा मृत्यु झाला आहे.






