Pandharpur Live- पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन कोरोनाच्या पार्श्वभुमीवर येत्या 15 जुलै पर्यंत बंदच राहणार असल्याची माहिती मंदिर समितीच्या वतीने देण्यात आलीय. आषाढी यात्रेच्या निमित्ताने 22 जुन ते 5 जुलै या कालावधीत ‘श्री’ चे 24 तास दर्शन सुरु असते त्यानुसार 24 जुन रोजी ‘श्री’ चा पलंग काढुन पांडुरंगास लोड व रुक्मिणीमातेस तक्क्या देण्यात आला होता. दि. 9 जुलै रोजी ‘श्री’ चा पलंग शेजघरात ठेऊन ‘श्री’ चे सुरु असलेले 24 तास दर्शन बंद होऊन सर्व राजोपचार सुरु होणार आहेत. दि. 9/7/2020 रोजी प्रक्षाळपुजेमुळे श्री चे नित्योपचार खालीलप्रमाणे राहतील.
Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019
कोरोना प्रादुर्भाव पाहता व भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दि. 17 मार्च 2020 ते 15 जुलै 2020 या कालावधीत भाविकांना श्रीविठ्ठल मंदिर दर्शनासाठी बंदच राहील. अशी माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.