पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मध्ये आज मोफत ऑनलाईन एमएचटी-सीईटी सराव परिक्षा


Pandharpur Live-
○ विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या आग्रहास्तव १० वी एमएचटी-सीईटी सराव परिक्षा

पंढरपूर : प्रमोद बनसोडे 

कोर्टी (ता. पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात लाॅकडाऊनच्या कालावधीत १२ वी परिक्षा दिलेल्या आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेऊ इच्छुक विद्यार्थ्यांना यापुर्वी ९ सराव मोफत एम.एच.टी. सी.ई.टी.-२०२० या परिक्षा पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाने ऑनलाईन पद्धतीने घेतल्या असुन आज रविवार दि. ५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता ते राञी ९ या वेळेत १० वी सराव परिक्षा होणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

   एम.एच.टी. सी.ई.टी.-२०२० मध्ये होणा-या परिक्षेची ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांचा सराव व्हावा. विद्यार्थ्यांना एम.एच.टी. सी.ई.टी. जास्तीत जास्त गुण प्राप्त व्हावेत यासाठी विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या आग्रहाने आग्रहास्तव आणि विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सराव होण्यासाठी पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज च्या वतीने रविवार दि. ५ जुलै २०२० रोजी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत यावेळी कधीही घरी बसुन ऑनलाईन पद्धतीने तीन तासाची २०० गुणांची एम.एच.टी. सी.ई.टी. सराव परिक्षा विद्यार्थ्यांनी देण्याचे आवाहन पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

  कोरोना या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने सर्वञ संचार बंदी घालण्यात आली आहे. या संचार बंदी च्या कालावधीत विद्यार्थ्यांना आपल्या घरी राहून २०२० मध्ये होणा-या एम.एच.टी. सी.ई.टी.-२०२० या परिक्षेचा अभ्यास करता यावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. यासाठी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना http://sknscoe.ac.in/cet.php या संकेतस्थळावर आज दिनांक ५ जुलै २०२० रोजी सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत या वेळेत ३ तासांची २०० गुणांची परिक्षा देता येणार आहे. ही परिक्षा विद्यार्थ्यांना घरी बसुन मोफत देता येईल.

     यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स या विषयातील प्रश्नांची रचना मुख्य एम.एच.टी.- सीईटी नुसार आणखी करण्यात आली असुन विद्यार्थ्यांना मुख्य एम.एच.टी.- सीईटी देण्यापूर्वी स्वयंमुल्यांकन करण्यासाठी सराव परिक्षा अतिशय फायदेशीर ठरणार आहे. 

    ज्या विद्यार्थ्यांना एम.एच.टी.- सीईटी-२०२० ची सराव परिक्षा द्यायची आहे. अशा विद्यार्थ्यांनी पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या http://sknscoe.ac.in/cet.php या संकेतस्थळाला भेट द्या. अधिक माहितीसाठी प्रा. सोमनाथ कोळी ८३७८०१७५४६ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.


Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019