आज पंढरपूर शहरातील एकाच भागात 8 तर तालुक्यातील रोपळे येथे 1 कोरोनाबाधीत.. आज एकुण 9 जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह


पंढरपूर (प्रतिनिधी) पंढरपूर शहरातील महापुर चाळ, संतपेठ येथे आज एकुण 8 कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आले आहेत.  तर तालुक्यातील रोपळे येथेही 1 कोरोनाबाधीत रूग्ण आढळून आला आहे.  या सर्वांचे रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आले आहेत. 

आज वाखरी येथील कोविड सेंटरमध्ये 80 जणांची रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट घेण्यात आली यातील दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. सध्या पंढरपूर शहर व तालुक्यातील मिळुन एकुण 33 कोरोनाबाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत.  अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी 
डॉ. एकनाथ बोधले यांनी दिली. 


Adv. आठवणीतील वारी: वेळवी रामवाडी (ता.दापोली, जि.रत्नागिरी) ग्रामस्थांची अविस्मरणीय दिंडी-2019