अनलॉक 4.0 मध्ये शाळा, कॉलेज उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याच्या चर्चा! जाणुन घ्या काय असतील नवे नियम?


पंढरपूर लाईव्ह ऑनलाईन:- 
नवी दिल्ली - कांही दिवसातच अनलॉक-3 संपेल. त्यामुळे अनलॉक 4.0 ची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे.  30 ऑगस्टपर्यंत या अनलॉकची मुदत असून महिन्याच्या शेवटी नवे नियम जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांशी व्यापक चर्चा केल्यानंतर, शाळा, महाविद्यालये आणि शिकवणी देणाऱ्या कोचिंग संस्था 31 ऑगस्ट 2020 पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय अनलॉक 3 दरम्यान घेण्यात आला होता. त्यामुळे शाळा, कॉलेज संदर्भात अद्याप माहिती मिळाली नाही. दरम्यान, राज्यात सप्टेंबरपासून शाळा, कॉलेज उघडण्यास परवानगी देण्यात येणार असल्याच्या चर्चा आहेत. या टप्प्यात मेट्रो सेवेला मंजूरी मिळू शकते अशीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. गृहमंत्रालय यासंदर्भात लवकरच मार्गदर्शक सुचना जारी करणार आहे. या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्य सरकारे निर्णय घेत असतात.

प्रवासी आणि माल वाहतुकीवरची बंधन उठवा असा सल्ला केंद्राने सर्वच राज्य सरकारांना नुकताच दिला होता. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी केंद्र सरकारने आता सर्व व्यवहार सुरळीत सुरु ठेवण्यासाठी कंबर कसली आहे. देशात सध्या Unlock 3 सुरु आहे. त्यासाठीची मार्गदर्शक तत्वेही केंद्राने जारी केली होती. मात्र या मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी केंद्र सरकारल्या मिळाल्या आहेत. त्यामुळे केंद्राने सर्व राज्य सरकारांना पत्र पाठवून फटकारलं असून प्रवासी आणि माल वाहतुकीवरचे निर्बंध उठविण्याचे निर्देश दिले आहेत.

संपूर्ण देशामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे लॉकडाऊन करण्यात आलं होतं. यामध्ये देशातील मंदिरांबरोबरच सर्व गर्दीची ठिकणे बंद करण्यात आली होती. गेल्या 5 महिन्यांपासून असणारे लॉकडाऊन आता शिथील करण्यात येत आहे. मात्र, अद्याप धार्मिक स्थळांना उघडण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

महाराष्ट्रात पिढ्यानपिढ्या दररोज मंदिरांमध्ये नित्यनियम भजन हरिपाठ करणारे लाखो मंडळी लॉकडाऊनमुळे गेली चार महिने अत्यंत अस्वस्थ आहेत. राज्य शासनाने अनेक उद्योगधंदे, हॉटेल्स, लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्याची परवानगी दिलेली आहे. तर दुसर्या बाजूला राज्यातील छोट्या छोट्या मंदिरांना मात्र अद्यापही कुलूप लावण्यात आलेलं आहे. राज्य सरकारने ही छोटी मंदिर सुरू करण्याची परवानगी द्यावी. तसेच आरोग्याच्या दृष्टीने व सामाजिक आरोग्याच्या दृष्टीने तोंडाला मास्क लावून सॅनिटायझरचा वापर करून तसेच सोशल डिस्टन्सिंगचे काटोकाट पालन करुन मंदिरात जाण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती ती वारकरी मंडळाने केलेली आहे.

केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी यासंदर्भात सर्व राज्यांना पत्र पाठवली आहेत. त्यात त्यांनी हे सर्व निर्बंध हटविण्याची मागणी केलीय. या निर्बंधांमुळे मालाच्या पुरवढ्यावर प्रतिकूल परिणाम झाले आहे. त्याचा परिणाम आर्थिक व्यवहांवर झाला आहे. त्यामुळे हे निर्बंध हटविण्यात यावेत असंही त्यात म्हटलं आहे.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये वाहतुकीवर अनेक निर्बंध आहेत. अजुनही जिल्हाबंदी कायम आहे. तर राज्यांमधली वाहतूक सुरु झालेली नाही. त्यामुळे अनेक उद्योगांना मालाचा पुरवढा सुरळीत होऊ शकलेला नाही. परंतु वाढणारी गर्दी लक्षात घेता आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्याबाबत राज्यात विचार करण्यात येत आहे. अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच घेतील असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं होतं.

Post a Comment

0 Comments