ज्येष्ठा कनिष्ठा भाद्रपदातील गौरीपूजनया देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रुपेण संस्थिता ॥ नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥ माझे गुरुवर्य, श्री. स्वामी सागरानंद सरस्वती महाराज तसेच वेदशास्त्रसंपन्न श्री. बाळकृष्ण भानुदास देव यांना नमन करून या लेखाची सुरुवात करतो. घरोघरी ज्येष्ठा कनिष्ठा देवींची घराघरात मोठ्या भक्तिभावाने, आनंदाने स्थापना केली जाते. भाद्रपदातील गौरी पूजनाचा निर्णय घेताना मध्याह्न व्यापिनी ज्येष्ठा नक्षत्राचे दिवशी गौरीपूजन करावे. प्रत्येक वर्षी या व्रताला शक्यतो मुहूर्त नसतो. कारण हे व्रत नक्षत्र प्रधान असल्याकारणाने नक्षत्रानुसार स्थापना, पूजन आणि विसर्जन करतात. परंतु यावर्षी श्री देवीची स्थापना मुहूर्तानुसार करावी लागेल.
दोन्ही दिवशी नक्षत्र मध्याह्नकाल व्याप्ती असता पहिल्या दिवशी पूजन करावे असे शास्त्र वचन असल्याने यावर्षी दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी गौरी पूजन करणे योग्य होईल. गौरीपूजनाचे आदले दिवशी अनुराधा नक्षत्रावर आवाहन आणि गौरी पूजनाचे दुसरे दिवशी मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असते. दिनांक 25 ऑगस्ट रोजी मंगळवारी अनुराधा नक्षत्रावर दुपारी 1:59 नंतर गौरी आवाहन करता येईल.
ज्येष्ठा नक्षत्र मध्याह्नी असलेल्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2020 रोजी गौरी पूजन करावे. आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करावयाचे असल्याने गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट 2020 रोजी दुपारी 12:37 नंतर गौरी विसर्जन करता येईल. दरवर्षी गौरी पूजनाच्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित करतात. परंतु यावर्षी संपूर्ण जगाला कोरोना सारख्या भयंकर महामारीने ग्रासल्यामुळे स्त्रियांनी हे व्रत घरीच आपल्या परिवारासोबत आनंदानं, भक्तिभावानं साजरे करावे जेणे करून गर्दी होणार नाही. तसेच प्रत्येकवर्षी गणपती विसर्जन करताना स्वतःच्या व इतरांच्या आरोग्याची, निसर्गाची आपल्या काळजी घ्यावी.
1 सप्टेंबर रोजी मंगळवारी अनंत चतुर्दशी आहे. 10 दिवसांच्या गणपतींचे आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशाचे विसर्जन या दिवशी दिवसभरात केव्हाही करता येईल. शाडू मातीच्या गणेशाचे विसर्जन पाण्यात घरच्या घरी बादलीत करून ते पाणी आणि माती झाडांना घालता येईल. पी.ओ.पी पासून बनविलेल्या गणपती मूर्तींचे विसर्जन हे स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करूनच करावे. कोणत्याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करून पर्यावरणाचे व आपल्या आरोग्याचे नुकसान होणार नाही याची खबरदारी घ्यावी. आणि बाप्पाचे विसर्जन सुखरूप व निर्विघ्नपणे पार पाडावे. बाप्पा आपल्याला लवकरात लवकर या कोरोना सारख्या भयंकर महामारीतून लवकरात लवकर मुक्त करो अशी प्रार्थना करूया.
डॉ. वे. शा. सं. श्री. पंकज पद्माकर घेवारे (शास्त्रीजी)
त्र्यंबकराज ज्योतिष कार्यालय
गावठा, पाचोरे गल्ली, सिन्नर
मो.9822679862


0 Comments