परळी वैजनाथ ... भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी येथील युवक नेते तथा पंकजाताई मुंडे व खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे खंदे समर्थक निळकंठ चाटे यांची निवड करण्यात आली आहे. पंकजाताई मुंडे यांनी नियुक्तीचे पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. दरम्यान मुंडे भगिनींनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ करून दाखवू असे प्रतिपादन नवनियुक्त जिल्हाध्यक्ष निळकंठ चाटे यांनी केले. निळकंठ चाटे हे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्यापासुन निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पंकजाताई मुंडे आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची ओळख आहे. निळकंठ चाटे हे अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी भाजपमध्ये विविध पदांवर काम केले आहे. भाजयुमोचे तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. महायुती सरकारच्या काळात त्यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष म्हणूनही चांगले काम केले आहे. निळकंठ चाटे यांचा बीड जिल्ह्यात दांडगा संपर्क असुन युवक कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. त्यांच्या व्यापक जनसंपर्काची दखल घेऊन माजी मंत्री पंकजाताई मुंडे व भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी भाजपा युवा मोर्चाची बीड जिल्ह्याची धुरा त्यांच्याकडे देत जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. पंकजाताई मुंडे यांनी मुंबई येथे निळकंठ चाटे यांना नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
विश्वास सार्थ करून दाखवू - निळकंठ चाटे पंकजाताई आणि खा. डॉ. प्रितमताई मुंडे यांनी भाजपा युवा मोर्चाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी निवड करून माझ्यावर खुप मोठा विश्वास टाकला आहे. त्यांचा विश्वास सार्थ करून दाखवणार असुन दोघींच्या नेतृत्वाखाली भाजपाचे काम वाढविणार असल्याचे सांगून त्यांनी टाकलेला विश्वास सार्थ करून दाखवू असे प्रतिपादन निळकंठ चाटे यांनी केले.
पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977
0 Comments