पंढरपूर: प्रतिनिधी- कोर्टी (ता पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड काॅलेज ऑफ इंजिनिअरींगला महाविद्यालयातील संगणक विभागात " क्लाउड कंम्पुटिंग " या विषयावर दि. ४ सप्टेंबर २०२० रोजी ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. हे वेबिनार उत्साहात संपन्न झाले असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक विभागात "क्लाउड कंम्पुटिंग" या विषयावर आय. टी .क्षेत्रातील तज्ञ वक्ते सुनील म्हमाणे यांनी विद्यार्थ्यांना गूगल मीट ऍप च्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन केले. सद्या कोरोना महामारीच्या काळातही विद्यार्थ्यांनी ऑनलाईन व्याख्यानांचा घरी बसून आपल्या मोबाइल द्वारे लाभ घेतला. विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील माहिती व्हावी, नवनवीन तंत्रज्ञानाची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी हे ऑनलाईन व्याख्यान दोन दिवस आयोजित करण्यात आले होते.
हे व्याख्यान दि. ३ सप्टेंबर ते ४ सप्टेंबर २०२० या कालावधीत संपन्न झाले. या ऑनलाईन व्याख्यानामध्ये संगणक विभागातील १०० अधिक विद्यार्थ्यांनी सहभागी घेतला होता. सहभागी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सुनिल म्हमाणे यांनी समर्पक अशी उत्तरे दिली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगणक विभागातील विद्यार्थी संघटना अॅक्सेस चे शिक्षक समन्वयक प्रा. एस. एस. इंगोले सह आय. ई. आय. स्टुडंट्स चाप्टर चे सिंहगड च्या संगणक विभागाचे अड्वायजर प्रा. एस. व्ही. पिंगळे, समन्वयक प्रा. आर. बी. परिहार यांनी काम पाहिले. अशी माहिती संगणक विभाग प्रमुख प्रा. एन. एम. सावंत यांनी दिली.
या ऑनलाईन वेबिनार मध्ये सहभागी तज्ज्ञांचे स्वागत विभागप्रमुख प्रा. एन. एम. सावंत व प्रा. एस. व्ही. पिंगळे यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आर. बी. परिहार यांनी केले तर तज्ज्ञांचे आभार प्रा. एस. एस. इंगोले यांनी मानले.
पंढरपूर लाईव्ह या लोकप्रिय ई-न्युज वेब पोर्टल आणि यु-ट्युब चॅनलवर जाहिराती व बातम्या प्रसिध्द करण्यासाठी संपर्क साधा. मोबा. 8149624977
0 Comments