एक स्पष्टवक्ता आणि प्रतिभाशाली व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड... भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन


पंढरपूर येथील कट्टर हिंत्ववादी, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचे प्रसारक, भागवताचार्य वा. ना. उत्पात यांचे कोरोनामुळे निधन झाले. पुणे येथील खाजगी रुग्णालयात कोरोनामुळे त्यांच्यावर उपचार सुरु असताना वयाच्य 80 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. 

भागवताचार्य यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद, श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्यपद, कवठेकर प्रशालेचे मुख्याध्यापकपद, पंढरपूर एज्यूकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्षपद, स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भुषविलेले होते. समस्त भागवताचार्य म्हणुन त्यांची ख्याती होती. सलग 25 वर्षे त्यांनी श्रीमद्भागवत कथा आणि रुक्मिणी स्वयंवर कथा सांगितली. पंढरीत भव्य असे स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय उभारण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या भागवत कथेच्या माध्यमातुन मिळणार्‍या उत्पन्नातुन त्यांनी सावरकर वाचनालयाच्या वास्तुची म्हणजेच क्रांतीमंदिराची उभारणी केली. याच वाचनालयात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती करुन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. 

त्यांच्या पश्‍चात 4 मुली, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे.

भागवताचार्य वा. ना. उत्पात यांच्या निधनामुळे पंढरी नगरीतील एक स्पष्टवक्ता आणि प्रतिभाशाली व्यक्तीमत्व पंढरपूरकरांनी गमावलेय. पंढरपूर लाईव्हकडून त्यांना भावपुर्ण श्रध्दांजली.   

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   हहह

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी 
संपर्क, मुख्य संपादक-  भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)


Post a Comment

0 Comments