राज्यात कोविड संदर्भात २ लाख ७० हजार गुन्हे ; २८ कोटी ५१ लाख रुपयांची दंड आकारणी ; १०० नंबरवर १ लाख १३ हजार फोन- गृहमंत्री अनिल देशमुख



          मुंबई दि. २८ : लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात आतापर्यंत कोविड संदर्भात कलम १८८ नुसार  २ लाख ७० हजार गुन्हे,तसेच  १३४७ वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल तर २८ कोटी ५१ लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली. अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

            राज्यात २२ मार्च ते २७ सप्टेंबर पर्यंत कलम १८८ नुसार २,७०,९९५ गुन्हे नोंद झाले असून ३७,०४४ व्यक्तींना अटक करण्यात आली.९६,४३०वाहने जप्त केली.

  यातील विविध गुन्हांसाठी  २८ कोटी ५१ लाख ६२  हजार ५६४ रु. दंड आकारण्यात आला.

    कडक कारवाई

            कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दलआरोग्य विभागडॉक्टर्सनर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आलेले आहेत.

             या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या ३६४ घटना घडल्या. त्यात ८९५ व्यक्तींना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

१०० नंबर- १ लाख १३ हजार फोन

      पोलीस विभागाचा १०० नंबर  हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  १,१३,३३५ फोन आलेत्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.

            या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १३४७ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर ९६,४३० वाहने जप्त करण्यात आली.

पोलीस कोरोना कक्ष

            कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात दुर्देवाने राज्यातील २२० पोलीस व २५ अधिकारी अशा एकूण २४५ पोलीस कर्मचारी/अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली  तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेतयाकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.

   नागरिकांचा सहभाग

         कोरोना विरुद्धच्या लढाईत राज्यातील प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा अपेक्षित आहे.  तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.  सर्वांनी नियम पाळून  सहकार्य करावेअसे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

Adv. रस्त्यावरील विक्रेत्यांना मिळणार 10 हजार रुपयांपर्यंतचे विनातारण कर्ज... केंद्रशासन पुरस्कृत पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी! पथविक्रेत्यांसाठी विशेष सुक्ष्म पतपुरवठा सुविधा योजना!

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
   हहह

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>


>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वर बातम्या अथवा जाहिराती देणेसाठी 
संपर्क, मुख्य संपादक-  भगवान वानखेडे मोबा.8308838111/8149624977 
(पंढरपूर लाईव्हचे कुठेही, कोणीही अधिकृत प्रतिनिधी अथवा पत्रकार नाहीत.)


Post a Comment

0 Comments