रक्तदान म्हणजे जीवनदान, रक्तदान हेच श्रेष्ठदान या उक्तींना अनुसरून तारापूर येथील बालगणेश बहुद्देशीय संस्थेने कोरोना काळातही गणेशोत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करून आपल्या समाजकार्याची परंपरा अविरत चालू ठेवली आहे.
एकीकडे कोरोना संकटाने थैमान घातले असताना या संकटाचे सावट यंदाच्या गणेशोत्सवावर सर्वत्र दिसून आले मात्र दुसरीकडे शासनाने घालून दिलेल्या नियमांच्या अधीन राहून आपले सर्व उपक्रम बाजूला सारून बालगणेश मित्र मंडळाने वेळेची गरज ओळखून इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित सौ. सरजुबाई बजाज रक्तपेढी, पंढरपूर यांच्या सहकार्याने रविवार दिनांक 30 ऑगस्ट रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. 25 ऑगस्ट रोजी संस्थेचे संस्थापक मित्र स्व.समाधान दत्तात्रय कोष्टी यांचे दुःखद निधन झाले होते. त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून श्रद्धांजली वाहण्यात आली व नंतर रक्तदानास सुरुवात केली. कोरोना काळ असूनही या रक्तदान शिबिरास गावातील तसेच पंचक्रोशीतील रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने उस्फुर्त रक्तदान केले. या रक्तदानात गावचे सरपंच समाधान शिंदे, गावातील राष्ट्रीय पातळीवरील मल्ल बाळासाहेब मच्छिंद्र सपाटे, महिला वर्गातून अंगणवाडी सेविका सरस्वती संभाजी वाघमारे, Advocate पंकज नायगुडे, स्वप्निल डोळे, यांच्यासोबतच संस्थेचे सर्व पदाधिकारी, सदस्य व विशेष करून गावातील युवक, प्रौढांनी उस्फूर्तपणे रक्तदान केले. इंडियन रेडक्रॉस सोसायटी संचलित सौ. सरजुबाई बजाज रक्तपेढी, पंढरपूर या रक्तपेढीच्या विश्वसनीय व तत्पर सेवेचा अनुभव असल्याने बालगणेश बहुद्देशीय संस्थेने याच रक्तपेढीचे सहकार्य नेहमीप्रमाणे या रक्तदान शिबिरासाठी घेतले. संस्थेने व सर्व रक्तदात्यांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता स्वेच्छेने व उस्फूर्तपणे रक्तदान केले व माणुसकी जपण्यासाठी आपले योगदान दिले.
या संपूर्ण कार्यक्रमासाठी संस्थेचे आधारस्तंभ व तारापूर गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष मा. बाळासाहेब तुकाराम सपाटे, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सह.सा.का.चे संचालक मा.प्रदीपदादा निर्मळ, गावचे सरपंच मा.समाधान शिंदे,Advocate रामलिंग तुकाराम कोष्टी,मनोज कोष्टी सर,जनहित शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रा.सुभाष शेंडगे,संस्थेचे अध्यक्ष सूरज कुलकर्णी, शिवराज डिजिटलचे प्रोप्रायटर दर्लिंग शिंदे, सागर सपाटे, युवा नेते प्रकाश सपाटे, बालाजी पुजारी सर,प्रशांत भुई,सतीश माने,प्रदीपभैय्या डोळे, श्री किशोर निर्मळ विद्यामंदिरचे चेअरमन सागर निर्मळ, सूरज क्षीरसागर, बाबा निर्मळ, अभिजीत शिंदे(संभाजी स्पीकर्स),विकास कसबे सर, बळीराम वाघमारे सर, ऋषिकेश कोष्टी,नारायण बुरांडे, संतोष चव्हाण(सुयश मेडिकल), अमर जवान मित्र मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी गणेशोत्सवाचे अध्यक्ष पुरुषोत्तम सर्जे, संस्थेचे उपाध्यक्ष सुहास सवाळकर, सचिव अनिकेत बुरांडे, खजिनदार ओंकार बाबतीवाले, सहसचिव अमोल सवाळकर, सदस्य सुजित कोष्टी, शिरीष डोळे आदि उपस्थित होते.*
0 Comments