Pandharpur Live Online लग्नाच्या भूलथापा देत मावस दाजीने मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या संबंधातून मेव्हणी गरोदर झाली आहे. ऑगस्ट 2020 पासून मोशीमध्ये हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार राहूल बबन भालेराव (वय 29, रा. भिमा कोरेगाव, ता. शिरुर) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या मावस मेव्हणीसोबत तिच्या संमतीशिवाय संबंध ठेवले. मेव्हणीला त्याने लग्नाच्या भूलथापा देत आमिष दाखविले होते. वारंवार मेव्हणीसोबत शरीरसंबंध ठेवल्याने ती गरोदर झाली आहे. या प्रकरणी मेव्हणीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे
0 Comments