हेळंब येथुन जवळच असलेल्या बोरणा नदीकाठी बोरणाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री.खंडोबारायाचे जागृत देवस्थान आहे. स्वतः खंडोबा हे हेळंब येथे वास्तव्याला होते. त्याचा पुरावा म्हणुन स्नान साठी वापरण्यात येते असलेल्या तीर्थ कुंड आजही उपलब्ध आहे. घोडा बांधन्यासाठी खुट उपलब्ध आहे. व त्याच्या खुना आजतागयत आहेत. श्री खंडोबा मंदिराची दुर दुर ख्याती आहे.
Advet.
...............
दरवर्षी चंपाषष्ठीला इथे मोठी यात्रा भरते. लाखो भाविक दर्शन घेतात.यात्रेनिमित्त कुस्ती स्पर्धा व अनेकप्रकारची दुकाने येतात यावर्षी कोरोनामुळे यात्रेतील कार्यक्रम रद्द करावेत अशा सुचना प्रशासनाने दिल्यानंतर हेळंब ग्रामस्थांनी एकमुखाने निर्णय घेत फक्त पालखी सोहळा पाच मानकर्यांच्या उपस्थितीत घेण्याचे व खंडोबाचे दर्शन सर्व नियम पाळून करण्याचा निर्णय घेतल्याने हेळंब येथील खंडोबा यात्रा साधेपणाने होणार आहे.



0 Comments