सिंहगड इन्स्टिट्युट मधील ५२ विद्यार्थ्यांची "बिर्लासॉफ्ट" कंपनीत निवड

       पंढरपुर : प्रतिनिधी

बिर्लासॉफ्ट डोमेन, एंटरप्राइझ, डिजिटल तंत्रज्ञानाची जोडणी करून ग्राहक आणि त्यांच्या पारिस्थितिक प्रणालीसाठी व्यवसाय प्रक्रियेचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी काम करत आहे "बिर्लासाॅफ्ट" कंपनीत ग्राहकांचा व्यवसाय चालविण्यात मदत करून त्याचा सल्लामसलत व डिझाइन विचार करण्याच्या पद्धतीमुळे कंपनी अधिक उत्पादक बनवते. अशा या कंपनीत सिंहगड इन्स्टिट्यूटमधील ५२ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती प्लेसमेंट विभाग प्रमुख प्रा. जयप्रकाश पिंताबरे यांनी दिली.

       सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंटसाठी स्वतंत्र विभाग आहे. या मध्ये विद्यार्थ्यांना कंपनीत निवड होण्यासाठी आवश्यक असलेल्या गुणांची माहिती दिली जाते. सिंहगड संस्थेतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होताच जगातील नामवंत असलेल्या कंपनीत विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळत असल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे. इन्स्टिट्यूटमधील विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावरील नॅशनल कंपनीत स्वतःचा ठसा उमटवून वेगळे व्यक्तिमत्व तयार करून आपले करिअर करीत आहेत.
         सिंहगड इन्स्टिट्युट मध्ये घेण्यात आलेल्या कॅम्पस इंटरव्हूवद्वारे ५२ विद्यार्थ्याची निवड मुलाखतीतून करण्यात आली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना बिर्लासॉफ्ट कंपनीकडून ३.६ लाखाचे वार्षिक पॅकेज दिले जाणार आहे.
      "बिर्लासाॅफ्ट" कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे सिंहगड इन्स्टिट्यूट मधील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments