पंढरपूर सिंहगड मध्ये "आय. आय. सी.इनोव्हेशन"कॉन्टेस्ट चे उद्घाटन

पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात आयोजित केलेल्या ऑनलाईन स्पर्धेत बोलताना प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यावेळी उपस्थित प्राध्यापक.

 पंढरपूर: प्रतिनिधी : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालय अंतर्गत येणाऱ्या "इन्स्टिट्यूट इनोव्हेशन कौन्सिल" च्या  "मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन"च्या 'इनोव्हेशन सेल' कडून आय. आय. सी. इनोव्हेशन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  ही स्पर्धा ऑनलाईन पध्दतीने  घेण्यात आली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

यामध्ये एज्युकेशन इनोव्हेशन सेलच्या मुख्य उद्देश उच्चशिक्षण होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या नावीन्यपूर्ण कल्पना, प्रत्यक्षात प्रोजेक्टच्या माध्यमातून प्रत्यक्षात आणण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण संस्था, संस्थेतील मार्गदर्शन शिक्षक व संशोधनात काम करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे हा मुख्य हेतू आहे.
 या स्पर्धेचे ऑनलाईन उद्घाटन पंढरपूर सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे बोलताना म्हणाले,  केंद्र सरकारचे अंतर्गत येणारी हि स्पर्धा  सिंहगड संस्थेमध्ये आयोजित करण्यात आली असुन हि स्पर्धेत ग्रामीण  भागातील या महाविद्यालचे अनेक विद्यार्थी सहभागी होत आहे. ही बाब निश्चितच सिंहगड साठी अभिमानाची आहे. सिंहगड नेहमीच विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकासासाठी तत्पर असते तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपल्या नावीन्यपूर्ण कल्पना प्रकल्पाच्या माध्यमातून तरूण करून त्या अविष्कार मध्ये सादर कराव्यात व देशातील तंत्रज्ञानाचे  विकास साधण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन अशा नावीन्यपूर्ण कल्पना मांडणाऱ्या या स्पर्धेत सिंहगड सारख्या महाविद्यालयातुन येणाऱ्या सर्व कल्पनांकडे समाजाचे नेहमीच लक्ष असते. तरी आपण सर्वांनी आपल्या कल्पना उत्कृष्ट मांडणी करावी असे मत पंढरपूर मत डाॅ. कैलाश करांडे यांनी बोलताना व्यक्त केले.

महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.  स्वानंद कुलकर्णी  यांनी महाविद्यालयातील इनोव्हेशन सेल अंतर्गत घेतलेल्या  विविध उपक्रमांची थोडक्यात आढावा घेतला. तसेच या सेल अंतर्गत यापुढे ही असे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला प्रेरणा देण्यात येणार आहे. असे मत मांडले.

या स्पर्धेच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीस बोलताना मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी यांनी स्पर्धेचे नियमावली, स्वरूप व स्पर्धेच्या निगडित इतर माहिती त्यांना दिली. या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. अतुल आराध्ये, प्रा. महिंद्र काटकर, प्रा. संगमनाथ उप्पीन, शशिकांत गिड्डडे, प्रा. अमोल जगदाळे यांनी पाहिले.

   ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील अभिजीत पाटणे, राजाराम राऊत आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments