शहीद अशोक कामटे संघटनेतर्फे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी.
सांगोला (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून जिजाऊसाहेबांनी रयत राज्य आणि राज्य धर्मासाठी आपले जीवन चंद्रासारखे उगाळले ,मेणबत्तीसारखे जाळले आणि प्रकाशित ठेवले .कर्तव्य हाच आपला धर्म मानला धैयासाठी अविरत प्रयत्न मानवता माणुसकी जपली पाहिजे, रयतेला जपले पाहिजे संदेश देणाऱ्या जिजाऊ सावित्री यांची आज चारशे वर्षानंतरही जयंती साजरी होत आहे याचा आम्हा स्त्रियांना खरोखरच सार्थ अभिमान असल्याचे प्रतिपादन सांगोला नगरपालिकेच्या नगरसेविका स्वातीताई मगर यांनी शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने जिजाऊंच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
सांगोला येथील तोरणा मुख्यालयात राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे नगरसेविका पूजा पाटील ,स्वातीताई मगर ,आशाताई सलगर ,श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, राजेंद्र पाटील, प्रा. विजय पवार यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .त्याचबरोबर सोलापुरातील चार हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी ,किसन सारडा ,जगन्नाथ शिंदे ,कुर्बान हुसेन यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. नंतर जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली ,यावेळी अभियंता ,मराठा सेवा संघाचे राजेंद्र पाटील सर यांनीही राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या कार्याबद्दल माहिती दिली. यावेळी विटा बँकेचे शाखाधिकारी बाळासाहेब कवडे ,संभाजी ब्रिगेडचे प्रताप (आबा) इंगोले ,विलासराव पाटील सर ,यांनीही जयंतीनिमित्त अभिवादन करून आपले विचार व्यक्त केले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहीद अशोक कामटे संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
0 Comments