औरंगाबादचे नामांतर 'संभाजीनगर' असे होणारच! - राज्यमंत्री अब्दुल सत्तार


Pandharpur Live Online : 

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या मुद्यावर देेखील सत्तार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सत्तार म्हणाले, संभाजीनगर हा शिवसेनेच्या अस्मितेचा मुद्दा आहे, शिवाय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला तो आदेश आहे. शिवसेनेत त्यांचा आदेश अंतिम असतो. राहिला प्रश्न काॅंग्रेसच्या विरोधाचा तर बाळासाहेब थोरात यांच्यांशी चर्चा करूच या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. असे राज्याचे महसुल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर होणारच, शिवसेनेमध्ये शिवसेनाप्रमुखांचा आदेश हा अंतिम असतो. बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर यापुर्वीच केले आहे. त्यावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्कामोर्तब करतील. त्यामुळे यात आता कुणालाही वाटा किवा फाटा मारता येणार नाही. काॅंग्रेसचा या नामांतरला विरोध असला तरी महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असेही ते म्हणाले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने सत्तार हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत. यावेळी खानापूर येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना सत्तार यांनी औरंगाबादचे संभाजीनगर होणारच असा दावा केला.


यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका केली. अब्दुल सत्तार म्हणाले, ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीच पहिल्या क्रमांकावर राहू असा दावा भाजपकडून केला जातो. पण त्यांचे दावे कसे फोल ठरतात हे आपण विधान परिषद निवडणुकीत पाहिले. सगळ्या जागा आम्हीच जिंकणार असे भाजपचे नेते सांगत होते. प्रत्यक्षात धुळे- नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेची एकमेव जागा सोडली तर भाजपला पराभवाचेच तोंड पहावे लागले.

Post a Comment

0 Comments