पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ. श्वेता निलराज डोंबे तर स्विकृत नगरसेवक पदी जगदिश मधुकर जोजारे, शिवाजी दिगंबर अलंकार व विजय परमेश्वर वरपे यांची निवड

Pandharpur Live :पंढरपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ.श्वेता निलराज डोंबे यांची निवड करण्यात आली. तर नामनिर्देशित सदस्य म्हणून जगदिश मधुकर जोजारे, शिवाजी दिगंबर अलंकार व विजय परमेश्वर वरपे यांची निवड करण्यात आली.पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा सौ. साधनाताई नागेश भोसले यांनी काम पाहिले.


यावेळी मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी सुनिल वाळुजकर, सभा लिपिक उमेश कोटगिरी यांनी सभेचे  कामकाज पाहिले.

यावेळी नूतन उपनगराध्यक्ष व  नामनिर्देशित सदस्य यांचा सत्कार नगराध्यक्षा सौ. साधनाताई भोसले,  पक्ष नेते अनिल अभंगराव आणि   गुरुदास अभ्यंकर  यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी नगरसेवक उपस्थित होते.

पंढरपूर लाईव्ह कडून नुतन उपनगराध्यक्षा व नगरसेवकांचे अभिनंदन!

Post a Comment

0 Comments