धक्कादायक... पुण्यातील जगप्रसिद्ध सिरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला भीषण आग

Pandharpur Live Online

 पुण्याच्या मांजरी परिसरातील सीरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. 



ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागल्याचे समोर आले आहे. आगीच्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दहा गाड्या दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

अडकलेल्यांना बाहेर काढण्यात यश

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सर्वप्रथम ही आग इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर लागली होती.

त्यानंतर ही आग वाढत गेली असून तिसऱ्या ते चौथ्या मजल्यापर्यंत आग पसरली आहे. या इमारतीमध्ये तीन जण अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी तीन जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढले आहे.

पुण्यातील जगप्रसिद्ध सिरम इन्स्टिट्यूटच्या नव्या इमारतीला भीषण आग लागली. सिरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी इथल्या नव्या इमारतीला ही आग लागली. सुदैवाने कोरोनावरील कोव्हिशिल्ड लस बनवण्याचं काम दुसऱ्या इमारतीत सुरु आहे. त्यामुळे कोरोना लस सुरक्षित असल्याचं सांगण्यात येत आहे. दुपारी दीड ते दोनच्या सुमारास ही आग लागली. या आगीत कोणताही जीवितहानी झालेली नाही. मात्र भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांनी व्यक्त केलेली शंका ही अत्यंत धक्कादायक आहे. आमदार मुक्ता टिळक यांनी या आगीमागे घातपाताची शंका आहे का असा प्रश्न विचारुन, तशी शंका व्यक्त केली.

कोरोनाविरुद्धच्या लसीला धोका नाही


पुण्याच्या मांजरी परिसरात ही आग लागली असून दुसऱ्या मजल्यावरुन धुराचे लोट दिसत आहेत. ज्या ठिकाणी ही आग लागली आहे ती आग बीसीजी लसीचे उत्पादन सुरु असलेल्या इमारतीला लागली आहे. त्यामुळे कोरोनाविरुद्धच्या कोविशिल्ड लसीचे उत्पादन सुरु असलेले ठिकाण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे.

दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळतेय. कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही. त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी नाही. हा घातपाताचा प्रकार वाटतोय, प्रथमदर्शनी असं वाटतंय. कारण ज्याठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार वाटतोय ही माझी शंका आहे, अशी माहिती भाजप आमदारा मुक्ता टिळक म्हणाल्या.


Post a Comment

0 Comments