Pandharpur Live Online:
कोरोना महामारी नियंत्रणासाठी लावण्यात आलेल्या टाळेबंदीच्या काळात दुकानातून मद्यविक्रीला बंदी घालण्यात आली असली तरी मद्यविक्रीची दुकाने तसेच बिअर शॉपीतून घरपोच मद्यविक्रीला शासनाने परवानगी दिली आहे.
टाळेबंदीच्या काळात दुकानातून मद्यविक्री बंद होती. फक्त बिअर बारमधून किंवा रहिवासी हॉटेल मधून घरपोच सेवेला परवानगी देण्यात आली होती.
१९ तारखेला राज्य शासनाने यासंदर्भात सुधारित आदेश जारी के ले आहेत. त्यानुसार यापुढे बिअर शॉपी आणि मद्यविक्रीच्या दुकानातूनही घरपोच सेवा सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
यामुळे मद्यप्रेमींना दिलासा मिळेल तसेच काळ्याबाजारात होणाऱ्या मद्यविक्रीलाही टाच बसणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना आदेश जारी करण्यास सांगण्यात आले आहे.
0 Comments