पुणे विभागात एकुण 10  लाख 2 हजार 701 कोरोनाबाधित रूग्ण ; जाणुन घ्या पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सध्याची रूग्णसंख्या

 Pandharpur Live:

पुणे विभागातील 8  लाख 44 हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी - विभागीय आयुक्त सौरभ राव यांची माहिती

 पुणे, दि. 19 :  पुणे विभागातील 8 लाख 44  हजार 420 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 10  लाख 2  हजार 701 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 38 हजार  818 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 19 हजार 463  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण  1.94 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 84.21 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.


*पुणे जिल्हा*
            पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण  7  लाख 22  हजार 476 रुग्णांपैकी 6  लाख 7  हजार 597  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 3 हजार 543  आहे. कोरोनाबाधित एकूण 11  हजार 336  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.57  टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण  84.10 टक्के आहे.
*सातारा जिल्हा*
              सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण  81  हजार 954 रुग्णांपैकी  66 हजार 664 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13  हजार 272 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार  18 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*सोलापूर जिल्हा*
              सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण  79  हजार 856 रुग्णांपैकी  66 हजार 492  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 11 हजार  70 आहेत. कोरोनाबाधित एकूण  2 हजार 294 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  *सांगली जिल्हा*
               सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 61  हजार  95 रुग्णांपैकी 52 हजार 110 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 53 आहेत.  कोरोनाबाधित एकूण 1 हजार  932 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कोल्हापूर जिल्हा*
            कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 57  हजार  320 रुग्णांपैकी  51 हजार 557 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 880 आहेत. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 883 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
*कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ*
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 17 हजार 44  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 12 हजार 707, सातारा जिल्ह्यात 1 हजार 434, सोलापूर जिल्ह्यात 1 हजार 479 , सांगली जिल्ह्यात  830 तर कोल्हापूर जिल्ह्यात 594 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
*कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण*  
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या 11 हजार 653 आहे. पुणे जिल्हयामध्ये  9 हजार  415, सातारा जिल्हयामध्ये 422, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 291, सांगली जिल्हयामध्ये 373  व कोल्हापूर जिल्हयामध्ये 152 रुग्णांचा समावेश आहे.
*पुणे विभागातील सर्व्हेक्षण*
आजपर्यत विभागामध्ये एकुण 59 लाख 36 हजार 712 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  10 लाख 2 हजार 701  नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
(टिप :- दि. 18 एप्रिल 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)
                                                                       0 0 0 0

Post a Comment

0 Comments