ब्रेकिंग: सोलापूर विमानतळावर भीषण आग!

Pandharpur Live Online:

सोलापूर विमातनळवार आज पहाटेच्या सुमारास भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. युद्धस्तरावर आग विझवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान या दुर्घटनेत कुठलीही जिवीतहानी झाली नसल्याचे प्राथमिक वृत्त आहे. तसेच आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

आगीची माहिती मिळताच अग्निशमनच्या सुमारे १२ गाड्या दाखल झाल्या. दरम्यान आग पसरू नये म्हणून सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले.

आगीच्या झळा परिसरातील शंकर नगर, रेवणसिध्देश्वर नगर, भारतमाता सोसायटीतील घरांना लागत होत्या. त्यामुळे या परिसरातील नागरिक घराबाहेर पडले होते. आगीच्या ज्वाळांमुळे परिसरात एकच घबराट पसरली. रात्री उशिरापर्यंत आग धुमसत होती, विमानतळ परिसराला सुरक्षा भिंत आसल्याने मोठा अनर्थ टळला.

Post a Comment

0 Comments