श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट ; कै.गोविंदराव एकनाथ निम्हण यांच्या स्मरणार्थ दुस-या रुग्णवाहिकेची ट्रस्टला देणगी
पुणे : कोरोनाच्या काळात अहोरात्र सेवा देण्यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टकडे असलेल्या ९ रुग्णवाहिकांमध्ये आणखी एका रुग्णवाहिकेचे भर पडली आहे. कै.गोविंदराव एकनाथ निम्हण यांच्या स्मरणार्थ निम्हण परिवारातर्फे देणगी म्हणून आणखी एक रुग्णवाहिका ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आली. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून कार्य करणा-या दगडूशेठ गणपती ट्रस्टकडे आता एकूण १० रुग्णवाहिका झाल्या असून त्या रुग्णसेवेत कार्यरत आहेत.
................................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा. https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
...................................
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळ च्यावतीने निम्हण परिवाराच्या उपस्थितीत मंदिरासमोर १० व्या रुग्णवाहिकेचे पूजन करण्यात आले. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सूर्यवंशी यांसह निम्हण कुटुंबिय उपस्थित होते.
सुमित्रा निम्हण म्हणाल्या, कै.गोविंदराव एकनाथ निम्हण यांच्या स्मरणार्थ मी आणि पद्मा निम्हण असे आम्ही निम्हण कुटुंबियांतर्फे ही रुग्णवाहिका देत आहोत. यापूर्वी ८ वी रुग्णवाहिका देखील आम्ही ट्रस्टकडे सुपूर्द केली होती. पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात रुग्णवाहिकेच्या माध्यमातून रुग्णसेवेचे कार्य ट्रस्टतर्फे सुरु असते. त्यात खारीचा वाटा देऊन आम्ही आमचे कर्तव्य पूर्ण केले आहे. यापुढेही गणरायाच्या कृपेने आम्ही अशा समाजोपयोगी कार्यात सहभागी होवू, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
यापूर्वी ट्रस्टतर्फे शहर, उपनगर, जिल्हा व गरजेनुसार महाराष्ट्रामध्ये जाण्याकरीता या रुग्णवाहिकांची सोय होती. पुणे शहराकरीता या विनामूल्य रुग्णवाहिका विनामूल्य सेवा देत आहेत. तर, पुण्याबाहेर महाराष्ट्रात कोठेही जाण्याकरीता डिझेल खर्चात ही सेवा उपलब्ध करुन दिली जात आहे. सुसज्ज अशा रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेत २४ तास उपलब्ध आहेत. आता यामध्ये १० व्या रुग्णवाहिकेची भर पडली आहे. तरी नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.
0 Comments