अर्जुनराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने गरजूंना अन्नधान्याचे वाटप ; अर्जुनराव चव्हाण यांचे कार्य कौतुकास्पद - आमदार समाधान आवताडे

 

पंढरपूर -:अखिल भारतीय मराठा महासंघाचे अर्जुनराव चव्हाण मित्रमंडळ पंढरपूर शहर व ग्रामीण यांचेवतीने कोरोना महामारी च्या संकटकाळात गोरगरीब व गरजू कुटूंबाना धान्य व किराणा सामानाचे वाटप केले. अर्जुनराव चव्हाण यांचे हे कार्य कौतुकास्पद  आहे असे मत आमदार समाधान आवताडे यांनी व्यक्त केले. 

आवताडे म्हणाले कोरोना महामारीमुळे गोरगरिबांचे व्यवसाय बंद पडले दुकाने बंद झाली, मजुरांना  काम नाही अशा परिस्थितीमध्ये अर्जुन चव्हाण यांनी  गोरगरीब गरजूंसाठी मदतीचा हातभार लावण्याचे काम केल्याबद्दल हे कार्य चालूठेवण्यासाठी शुभेछया दिल्या . 

................................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा. https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ...................................

कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीपांडुरंगाच्या प्रतिमेचे पूजन आवताडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार समाधान आवताडे यांचा सत्कारही करण्यात आला. या कार्यक्रमास प्रांताधिकारी सचिन ढोले, पांडुरंग साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन वसंतराव देशमुख, युवा नेते प्रणव परिचारक यांची प्रमुख उपस्थिती होती. 

या सर्व मान्यवरांच्या व आमदार समाधान ( दादा)आवताडे यांच्या हस्ते गोरगरीब गरजुना  धान्य व किराणा  मालाचे वाटप करण्यात आले.कोरोनाच्या पार्शवुभूमीवर सर्व नियमांचे पालन यावेळी करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली. 

यावेळी प्रकाश बाबर,तुकाराम कजरे,समाधान घायाळ,नौशाद शेख ,  वैभव लिंगे ,विनोद लटके, भैया कळसे, आबासाहेब पाटील, पांडुरंग 

करकमकर,अमोल धोत्रे,अब्दल भट्टीवाले, उमेश सासवडकरव इतर कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 

मराठा महासंघाचे अर्जुनराव चव्हाण यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अर्जुनराव चव्हाण मित्र मंडळाने प्रयत्न केले. 

Post a Comment

0 Comments