पुणे विभागातील 11 लाख 20 हजार 317  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी ; विभागात कोरोना बाधित 13  लाख 17 हजार  453 रुग्ण

 
 पुणे, दि. 9 : पुणे विभागातील  11 लाख  20 हजार 317  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 13 लाख 17 हजार 453 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 72  हजार 139 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 24  हजार 997  रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.90 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 85.04 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा
            पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9  लाख  13 हजार 618  रुग्णांपैकी  7 लाख 99  हजार 346  रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 1 लाख 118 आहे. कोरोनाबाधित एकूण 14 हजार 154 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण  1.55 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.49  टक्के आहे.
सातारा जिल्हा
              सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख  20 हजार 824  रुग्णांपैकी 94  हजार 354 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  23 हजार  988 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 482 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
              सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख  16 हजार 522  रुग्णांपैकी 93  हजार 818 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 19  हजार 565 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3  हजार  139 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 
  सांगली जिल्हा
               सांगली  जिल्ह्यातील  कोरोना बाधीत एकूण 89 हजार 413 रुग्णांपैकी 69  हजार 783 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार  28आहेत.  कोरोनाबाधित एकूण  2 हजार 602 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
            कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 77 हजार 76 रुग्णांपैकी 63 हजार 16 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या  11 हजार 440 आहे. कोरोनाबाधित एकूण  2 हजार 620 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
              कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 16 हजार 504  ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 9 हजार 357 , सातारा जिल्ह्यात 2 हजार 417 , सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 14 सांगली जिल्ह्यात 1  हजार 720  तर कोल्हापूर जिल्ह्यात  996 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण  
             पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण  संख्या 15 हजार 784 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 619, सातारा जिल्हयामध्ये 2 हजार 115, सोलापूर जिल्हयामध्ये 1 हजार 747, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार380 व कोल्हापूर जिल्हयामध्ये  923 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
            पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 23 लाख 49 हजार 62 , सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 31  हजार 17 , सोलापूर जिल्हयामध्ये 3 लाख 95 हजार 259 , सांगली जिल्हयामध्ये 5 लाख  98 हजार 386 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये  10 लाख  32 हजार  789 नागरिकांचा समावेश आहे
पुणे विभागातील सर्व्हेक्षण 
         आजपर्यत विभागामध्ये एकुण  73  लाख 63  हजार 979 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी  13 लाख  17 हजार 453 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे. 
 (टिप :- दि.  8  मे 2021 रोजी रात्री 9.00 वा. पर्यंतच्या आकडेवारीनुसार)   00000

Post a Comment

0 Comments