Pandharpur Live Online : भारताला लागणारी वैद्यकीय उपकरणे तसेच ऑक्सिजनचा पुरवठा यांसारख्या गोष्टी बाहेर देशातून भारताला मिळत आहेत. यावरूनच महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे नेते तसेच मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
देशभरात सध्या कोरोनाने थैमान घातलं आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे देशात आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. परिणामी आरोग्य व्यवस्था अपुरी पडत असल्याचं चित्र भारतामध्ये सध्या पाहायला मिळत आहेत. यामुळेच जगभरातून भारताला मदतीचा हात मिळताना गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे.
जगातील अनेक देश भारताला वेगवेगळ्या प्रकारची मदत करून या महामारीच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी मदत करत असून भारताला लागणारी वैद्यकीय उपकरणे तसेच ऑक्सिजनचा पुरवठा यांसारख्या गोष्टी बाहेर देशातून भारताला मिळत आहेत. यावरूनच महाराष्ट्राचे राष्ट्रवादीचे नेते तसेच मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
'परदेशातून मदतीची विमानेच्या विमाने भारतात येत आहेत, असं दिसून येत आहे. पण ती मदत नेमकी कुठे जाते हे कळत नाही', असं म्हणत जयंत पाटील यांनी ती मदत नेमकी कुठे जाते, याचा खुलासा केंद्र सरकार करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार असा वाद पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत.
दरम्यान, भारतात दर दिवशी परदेशातून मदतीची विमानेच्या विमाने उतरत आहेत. पण ही मदत महाराष्ट्राला तर काही मिळाली नाही. त्यामुळे ही मदत नेमकी कुठे जात आहे, याचा खुलासा केंद्र सरकारने करावा, अशी अपेक्षा जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे.
0 Comments