पुन्हा वेगळीच चर्चा... पंढरपूर पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करणारे ॲड. नितीन माने यांचा राष्ट्रवादीशी काहीही संबंध नसल्याचा खुलासा

 

Pandharpur Live Online: आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत सत्ताधारी महाविकास आघाडीचे उमेदवार भगिरथ भालके यांचा पराभव झाला. सोशल मीडियावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या लीगल सेलने ही पोटनिवडणूक पुन्हा घेण्याची मागणी करणारं पत्र फिरू लागलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं या बातमीवर संबंधित पत्राद्वारे मागणी करणारे ॲड. नितीन मानेंचा राष्ट्रवादीशी काहीच संबंध नसल्याचा खुलासा केल्याने पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक निकालाबाबत आणखी वेगळीच चर्चा रंगलेली आढळून येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसनं निवेदन प्रसिद्ध करत म्हटलंय की, अँड नितीन माने या नावाचा व्यक्ती स्वत:ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या लीगल सेलचा महाराष्ट्र कार्यकारणी सदस्य असल्याचं भासवत असून त्याचे लेटर हेडदेखील बनविले आहे. त्या लेटरहेडचा वापर करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलच्या नावाचा गैरवापर करून विविध निवेदन आणि तक्रारी देत आहे. मात्र अँड. नितीन माने, मुंबई याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी लीगल सेलशी काहीही संबंध नाही असं स्पष्ट करण्यात आलं आहे.

Post a Comment

0 Comments