Pandharpur Live Online: 'गोकुळ' मध्ये (कोल्हापूर जिल्हा दूध संघ) मंगळवारी सत्तांतर घडले. रात्री उशीरापर्यंत सुरू असलेल्या या मतमोजणीत एकूण २१ पैकी १७ जागांवर विजय मिळवत विरोधी गटाने हा बदल घडवला आहे. सत्ताधारी गटाला केवळ ४ जागांवरच समाधान मानावे लागले. या निकालामुळे राज्यातील सर्वात मोठ्या दूध संघावर पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गटाचे वर्चस्व निर्माण केले असून भाजपकडे झुकलेल्या महाडिक गटाची 'गोकुळ'मधील तीस वर्षांचे वर्चस्व संपुष्टात आले आहे.
'गोकुळ' हा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा व्हावा ही आमची इच्छा होती. त्याला मतदारांनी अनुकूल कौल दिला आहे. दुधाला प्रति लिटर दोन रुपयांची वाढ देण्याचे आश्वासन आम्ही पूर्ण करू.
- सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर


0 Comments