प्रत्येक नव्या जोडप्यासाठी त्यांनी हनीमूनची रात्र ही अतिशय खास असते. पण याच दिवशी नवरदेवाची नववधू त्याच रात्री पळून गेली तर? तर झालं असं की धनबादच्या टुंडीमध्ये नवरी टॉयलेटला जाण्याचं कारण सांगत खोलीतून बाहेर आली आणि पळून गेली.
बराच वेळ नवरदेव आतुरतेने वाट पाहत होता. बराचवेळा झाला नववधु आली नाही. घर नवीन काही गोंधळ तर झाला नाही ना असे ना ना विचार त्याच्या मनात आले. शंकेची पाल मनात चुकचुकली म्हणून त्याने नवरीचा शोध सुरू केला.
बराच काळ शोधाशोध केल्यानंतर सासरहून नवरीच्या घरी फोन लावण्यात आला. तेव्हा समजलं की ती माहेरी गेली. नेमकं असं काय घडलं? हा प्रश्न साऱ्यांनाच पडला. तर झालं असं नव जोडप्याच्या हनीमुनमध्ये कोरोना खो घातला. हनीमुनच्या रात्री नववर नववधुच्या खोलीत आला. तेव्हा तो खोकू लागला. अचानक नवरदेवाला खोकला जाणवू लागल्यामुळे नववधु घाबरली. आणि चक्क कुणालाही काहीही न सांगता माहेरी निघून गेली.


0 Comments