Pandharpur Live Online:Pandharpur Live Online: अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त चुकीचं असून, सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असं स्पष्टीकरण दिल्लीतील AIIMS रुग्णालयाने दिलं आहे.तिहार तुरूंगात शिक्षा भोगत असलेला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याची 27 एप्रिलला कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याला उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
छोटा राजन याला जानेवारी महिन्यात सीबीआयच्या विशेष न्यायलयाने छोटा राजनला 26 कोटी रूपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी शिक्षा सुनावली होती. पनवेल येथील एक बिल्डर नंदू वाजेकर यांनी पुण्यात एक जागा डेव्हलपमेंट करण्यासाठी घेतली होती. ही जागा वाजेकर याला एका एजंटने दिली होती. या बदल्यात वाजेकर याने एजंटाला दोन कोटी रुपये दिले होते. मात्र, यानंतर ही आपला व्यवहार पूर्ण झाला नसल्याचं कारण पुढे करत एजंटाने पैसे मागायला सुरुवात केली होती. जास्त पैसे मिळावे म्हणून एजंटाने या व्यवहारात गँगस्टर छोटा राजन याला मध्यस्थी करायला सांगितली होती. त्यामुळे छोटा राजन याने बिल्डर वाजेकर याला फोन करून धमकावलं होत आणि प्रकरण मिटवायला सांगितलं होतं. अखेर 2015 साली बिल्डर नंदू वाजेकर याने पोलिसात तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणात छोटा राजन याच्यासह तीन साथीदारांना दोषी ठरवून शिक्षा सुनावण्यात आली आहे. छोटा राजन याच्यासह सुरेश शिंदे, सुमित म्हात्रे आणि अशोक निकम यांनाही दोन वर्षे शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड अशी ही शिक्षा सुनावली आहे.
छोटा राजन याला आतापर्यंत सुनावण्यात आलेल्या शिक्षा अशा आहेत
1) पत्रकार जे. डे. प्रकरण - जन्मठेप
2) दिल्ली एथिक बोगस पासपोर्ट प्रकरण - दोन वर्षे
3) बी. आर. शेट्टी फायरिंग केस - 10 वर्ष शिक्षा
4) बिल्डर वाजेकर खंडणी केस- दोन वर्षे शिक्षा.
मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयानं जानेवारी महिन्यात राजनला खंडणी प्रकरणी दोन वर्षांती शिक्षा सुनावली. पनवेलमधील बांधकाम व्यावसायिकाकडे २६ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती. २०१५ सालच्या प्रकरणात ही शिक्षा सुनावण्यात आलेली. मुंबईतलं राजनविरोधातील हे खंडणीचं तिसरं प्रकरण होतं, ज्यात त्याला शिक्षा सुनावण्यात आलेली. यापूर्वी दिल्लीतील बनावट पासपोर्ट प्रकरणातही शिक्षा सुनावण्यात आली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये राजनला इंडोनेशियामधील बालीतून भारतात आणण्यात आले होते.
0 Comments