धक्कादायक... संचारबंदीमुळे गर्दी करण्यास मनाई केल्याने जमावाचा पोलिसांवर हल्ला; पोलीस चौकीसह गाड्यांची तोडफोड


Pandharpur Live Online: कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी संचारबंदी लागू आहे. त्यामुळे गर्दी करण्यास सक्त मनाई आहे. मात्र, अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर शहरात पोलिसांनी गर्दी करण्यास मनाई केल्याने जमावाने थेट पोलिसांवरच दगडफेक करत हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय. संगमनेर शहरातील दिल्ली नाका परिसरात हा प्रकार घडला. सध्या याचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. पोलिसांनी हल्लेखोरांवर कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे 

मोठी गर्दी उसळल्याने ती रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच जमावाने हल्ला करण्याची संताप जनक घटना गुरुवारी (दि.६) रात्रीच्या सुमारास संगमनेरातील तीनबत्ती चौकात घडली. अहमदनगर येथील राज्य राखीव पोलिस दलातील काही कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती असून जमावाने दगडफेक करून काही खाजगी वाहनांचेही नुकसान केल्याचे वृत्त आहे.

हल्ला करणाऱ्या जमावाने पोलिसांना धक्काबुक्की करत मारहाण केली. जमावाने पोलीस कर्मचाऱ्यांचा पाठलाग करत हल्ला केल्याचं सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत दिसत आहे. हल्लेखोरांनी यावेळी पोलीस चौकीसह पोलिसांच्या गाड्यांचीही तोडफोड केली.

हल्ल्याची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्यासह संगमनेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक मुकुंदराव देशमुख यांनी घटनास्थळी येऊन जमावाला पांगवलं. तसेच 6 आरोपींसह अज्ञात जमावावर गुन्हा नोंदवण्यात आला.

Post a Comment

0 Comments