उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी केली धाराशिव कारखान्याच्या पायलट ऑक्सिजन प्रकल्पाची पाहणी


 

Pandharpur Live: सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे अनेक कोरोना रूग्णांना ऑक्सिजनची गरज भासत असल्याने साखर कारखान्यामध्ये प्रथमच ऑक्सिजनची निर्मिती करणार असल्याने धाराशिव साखर कारखान्यावर उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख, खासदार ओमराजे निंबाळकर यांनी अंतिम टप्प्यात असलेल्या या कामाची   पाहणी केली. 

या भेटीदरम्यान ऑक्सिजन प्रकल्पासंदर्भात श्री. गडाख यांनी संपूर्ण माहिती घेऊन चाचणी कार्यान्वित करण्यास सांगितले. वाढत्या ऑक्सिजनच्या मागणीनुसार सगळ्याचे लक्ष धाराशिव साखर कारखान्याच्या पायलट प्रकल्पाकडं लागले असून लवकरच याची यशस्वीरित्या चाचणी होणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी बोलताना सांगितले. 

यावेळी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी  कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी श्रीमती.रुपाली आवळे, निवासी उप जिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपविभागीय अधिकारी कळंब डॉ.श्रीमती.अहिल्या गाठाळ, अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी, तहसिलदार रोहन शिंदे, मंडल अधिकारी देवानंद कांबळे, कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, दिपक  आदमिले आदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments