उजनी धरण लवकरच येणार प्लसमध्ये! मागील दहा दिवसांत धरणात साडेपाच टीएमसी पाणी जमा; सध्या धरणात 58.16 टीएमसी पाणी

 

Pandharpur Live Online: उजनी धरणाची वाटचाल आता प्लसकडे सुरू असून, मागील दहा दिवसांत धरणात साडेपाच टीएमसी पाणी जमा झाले आहे. सध्या धरणात 58.16 टीएमसी पाणी असून, आणखी साडेपाच टीएमसी पाणी आल्यास धरण प्लसमध्ये येईल, अशी माहिती अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यासाठी करदायिनी ठरलेल्या उजनी धरणात गतवर्षी 28 जूनपर्यंत मायनस 18 टक्के पाणीसाठा होता. परंतु, सध्या उजनी धरणात मायनस 10.27 टीएमसी पाणी आहे. बंडगार्डनच्या तुलनेत दौंडमधून चांगला विसर्ग आल्याने उजनी धरणाची पाणी पातळी सुधारली आहे. पावसाळ्यापूर्की उजनी धरणातील पाणीसाठा मायनस 21 टक्क्यांवर पोहोचला होता.

.............................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ..................................

आता दहा टक्के मायनस कव्हर करण्यासाठी साडेपाच टीएमसी पाण्याची गरज आहे. उजनी धरण क्षेत्र व पुणे जिल्ह्यात मागील दहा दिवसांत चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणाची पाणी पातळी सुधारू लागल्याचेही साळे यांनी सांगितले. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा चांगला पाऊस होणार असल्याने उजनी धरण जुलैमध्ये निश्चितपणे भरेल, असा विश्कासही त्यांनी व्यक्त केला.

पुणे व सोलापूर जिह्यातील धरण क्षेत्रात पाऊस चांगला झाल्याने मागील दहा-बारा दिवसांत धरणात साडेपाच टीएमसी पाणी वाढले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत धरणातील पाणी पातळी चांगली आहे. धरणाची पातळी सध्या मायनस 10.27 टक्के आहे. - धीरज साळे, अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग, सोलापूर.

Post a Comment

0 Comments