त्यानुसार नागपूर मार्गावर रेल्वेने तीन गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अहमदाबाद, काझीपेठ, मुंबई, कोल्हापूर- नागपूर, अमरावती आदी मार्गांवरील रेल्वे वाहतूक आता पूर्ववत करण्यात येत आहे. प्रवासी संख्या वाढेल त्या प्रमाणात गाड्यांच्या संख्येत वाढ होईल, असे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
.............................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
..................................
केवळ कन्फर्म तिकिट असणाऱ्या प्रवाशांनाच रेल्वेगाड्यांत प्रवेश मिळेल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले. एनटीईएस या ॲपवरूनही रेल्वेची तिकिटे आणि आरक्षण प्रवाशांना उपलब्ध होईल, अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी सांगितले. मास्कशिवाय प्रवाशांना प्रवासाची परवानगी मिळणार नाही तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून प्रवाशांनी प्रवास करावा लागेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


0 Comments