पंढरपूर: प्रतिनिधी: कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयात शनिवार दिनांक ५ जुन २०२१ रोजी प्रा. वैभव कुलकर्णी यांचे "इनोव्हेशन अँम्बॅसेंडर" या विषयावर ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आले होते. हे वेबिनार मोठ्यात उत्साहात संपन्न झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.
..............................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
...................................
महाविद्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन वेबिनार मध्ये प्रा. वैभव कुलकर्णी यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी केले. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी व मेकॅनिकल इंजिनिअरींग विभाग प्रमुख डॉ. श्याम कुलकर्णी यांनी प्रमुख मार्गदर्शक प्रा. वैभव कुलकर्णी यांचा परिचय करून दिला.
ऑनलाईन वेबिनार मध्ये मार्गदर्शन करताना प्रा. वैभव कुलकर्णी म्हणाले, अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी इनोव्हेशन विषयी दुसर्या वर्षात विचार करून शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असताना प्रोजेक्टच्या माध्यमातून डिझाइन थिंकिंग मार्फत कसे इनोव्हेशन करता येईल याविषयी संपुर्ण माहिती विद्यार्थ्यांना या वेबिनार मध्ये प्रा. वैभव कुलकर्णी यांनी दिली. यादरम्यान डिस्कव्हरी इनोव्हेशन म्हणजे काय, लोकल आणि ग्लोबल प्राॅब्लेम मध्ये काय फरक असतो? काॅम्फेलक्स प्राॅब्लेमला सिंपल सोल्युशन्स कसे आपण शोधु शकतो या सह अशा अनेक विविध मुद्द्यांवर विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
हे वेबिनार यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील डाॅ. बाळासाहेब गंधारे, प्रा. धनंजय गिराम, प्रा. महिंद्र काटकर, प्रा. राहुल शिंदे, मयुरा माळी आदीसह महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.


0 Comments