आषाढी वारी 2021: ज्ञानोबा-तुकाराम च्या जयघोषात आणि टाळमृदंगाच्या निनादात 'येथे' रंगला पहिला गोल रिंगण सोहळा

 Pandharpur Live Online: टाळ-मृदुंगाच्या निनादात आणि ज्ञानोबा माऊली तुकाराम च्या गजरात देहू मधील जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिर परिसरात आज रविवारी पहिले गोल रिंगण संपन्न झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत झाला. रिती-परंपरा यामध्ये कुठला खंड पडू नये म्हणून देहूमधील देऊळवाडा परिसरात हे प्रतीकात्मक गोल रिंगण पार पडले. परंपरेनुसार हे रिंगण इंदापूर तालुक्यातील बेलवडी गावात पार पडत असते.


वारीच्या परंपरेत कुठलाही खंड पडू नये यासाठी देहू मधील संत तुकाराम महाराज संस्थानकडून हे पहिले गोल रिंगण प्रतिकात्मक स्वरूपात आणि मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडले. यावेळी वारकऱ्यांनी आणि अश्व यांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखीला रिंगण केले होते. पारंपरिक पद्धतीने आरतीही करण्यात आली.

यावेळी तुतारी वाजताच उपस्थित सेवेकऱ्यांनी गरुड टक्के, अब्दागिरी, पताका व जरी पटका घेत आप आपल्या सेवेला सुरवात केली. त्यानंतर पालखी खांद्यावर घेत मंदिराच्या आवारात आणली.

    ..................

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    "पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ..................

दरम्यानच्या काळात चोपदार यांच्या वारीतील दंडाच्या इशारा झाला आणि उपस्थितांनी भजन करीत पावले खेळण्यास सुरवात केली. दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पावले खेळण्याचे झाल्यानंतर वारीतील वाटचाली प्रमाणे उपस्थित वारकऱ्यांनी गोल रिंगण केले. मधोमध पालखी ठेवण्यात आली. तेथे काही काळ भजन करीत पावले फुगड्यांचाही डाव रंगात आलेला असताना खेळ खेळत गोल रिंगणाला सुरवात झाली.

सर्व उपस्थित वीणेकरी, मृदंगवादक, वारकरी संप्रदयाची भगवी पताका खांद्यावर घेऊन वारकरी, डोक्यावर तुळस घेऊन वारकरी भगिनी मंदिराच्या आवारात रिंगणात धाव घेतली. त्यानंतर रिंगणात पाढरा शुभ्र अश्व रिंगणात आणला. घोडेस्वाराच्या खांद्यावर भगवी पताका घेऊन अश्व रिंगणात सोडण्यात आला. यावेळी वारकऱ्यांनी ज्ञानोबा तुकाराम नामाचा गजर करीत आनंद व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments