मुलांना शाळेत पाठवायची तयारी आहे... शाळा सुरू करा! शिक्षण विभागाच्या सर्वेक्षणात 85 टक्के पालकांची संमती ; शहरातील शाळा सुरू करण्याबाबत लवकरच निर्णय घेणार- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड


 

Pandharpur Live Online:

कोरोनामुळे मागील वर्षभरापासून घरातूनच ऑनलाइन शाळांना हजेरी लावणाऱया विद्यार्थी, पालकांना आता शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा आहे. शाळा सुरू करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाने कालपासून सुरू केलेल्या सर्वेक्षणात आतापर्यंत 85 टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठविण्यास तयारी दर्शविली आहे.

शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये राज्यातील कोरोनामुक्त ग्रामीण भागातील पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरु करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. यासह इतर इयत्तांच्या शाळा कधी सुरू होणार, असा प्रश्नही समोर येत होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक, शिक्षक यांच्याकडून शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेतले आहे.

सदर सर्वेक्षण सोमवार, 12 जुलै रात्री 11.55 पर्यंत सुरू राहणार आहे. राज्यातील सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक, शिक्षण अधिकारी यांनी पालकांना सदर सर्वेक्षणात आपले मत नोंदविण्याचे आवाहन परिषदेचे संचालक दिनकर टेमकर यांनी केले आहे.

पालकांना विविध प्रश्न विचारून शाळा सुरू करण्याबाबत त्यांचे मत जाणून घेतले जाणार आहे. यामध्ये शाळा कोणत्या भागात येते, तेथील कोरोनाची परिस्थिती, पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यास तयार आहेत का याबाबतची माहिती घेतली जाणार आहे.

कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा 15 जुलैपासून सुरू करण्याची परवानगी शिक्षण विभागाने दिली असून ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांनी ठरावाने शाळांबाबत निर्णय घेणे अपेक्षित आहे.

ग्रामीण भागात सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार असून पालकांच्या सूचना, अभिप्रायदेखील महत्त्वाचा असणार आहे.

    ..................

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    "पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ..................

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन  प्रशिक्षण परिषदेने सर्वेक्षणाची लिंक दिली असून http://www.maa.ac.in/survey या लिंकवर जाऊन पालकांनी शाळा सुरू करण्याबाबत अभिप्राय नोंदवायचा आहे .

सर्वेक्षणाची आकडेवारी अशी

  • आतापर्यंत एकूण 2,25,194 पालकांनी आपले मत नोंदविले आहे.
  • यात ग्रामीण भागातून 1,18,182 म्हणजेच 52.48% पालक
  • निमशहरी भागातून 23,948 म्हणजेच 10.63% पालक
  • शहरी भागातून 83,064 म्हणजेच 36.89 % पालक
  • यात शाळेत पाठवायला तयार असणारे 1,89,095 म्हणजेच 83.97% पालक
  • शाळेत पाठवायला इच्छुक नसणारे 36,099 म्हणजेच 16.03% पालक

कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण भागात पहिल्या टप्प्यात आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलैपासून सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत . या पार्श्वभूमीवर इतर इयत्तांच्या शाळा सुरू करण्यासंदर्भातही पालकवर्गातून विचारणा होत आहे . त्यामुळे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , पुणे यांनी शालेय शिक्षण विभागामार्फत राज्यातील सर्व पालक , शिक्षक यांचे शाळा सुरू करण्याबाबत सर्वेक्षण हाती घेतले असून आतापर्यंत 85 टक्के पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्यास तयार असल्याचे म्हटले आहे . सदर सर्वेक्षण सोमवार , 12 जुलै रात्री 11.55 पर्यंत सुरू राहणार आहे .

शहरातील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेऊ- शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड 

कोरोना Corona नियमांचे पालन करीत ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग १५ जुलैपासून सुरु करण्यात येणार आहेत. त्यानंतर आढावा घेऊन लवकरच शहरी भागातील शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड School Education Minister Varsha Gaikwad यांनी शनिवारी (ता.दहा) औरंगाबादेत Auranabad दिली. लॉकडाऊनमुळे Lock Down शिक्षणात खंड पडल्यामुळे बालविवाह, बालमजुरी, मुलामुलींच्या गळतीचे प्रमाण वाढले. मुलांचे आणखी शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने ग्रामीण भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग कोरोनामुक्त गावात सुरू करण्याचे जाहीर केले.

कोरोनामुक्त असलेल्या गावात आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी सुधारीत शासन निर्णय जाहीर करण्यात आला. यानुसार १५ जुलैपासून शाळा सुरु होतील. यासाठी स्थानिक प्रशासनाकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. १५ जुलैपासून कोरोनामुक्त गावातील शाळा सुरु झाल्यानंतर शहरी भागातील शाळाही सुरु करण्याबाबत शासनाकडून हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. सर्व जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेऊन लवकरच शहरी भागातील शाळा देखील सुरु करण्यात येणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.

शहरी भागातील शाळा सुरु करण्यासंदर्भात राज्यातील अनेक पालक तसेच स्थानिक आमदारांकडून विचारणा केली जात आहे. ग्रामीण भागातील शाळा सुरु झाल्यानंतर मागील वर्षी प्रमाणे टप्प्याटप्प्याने शहरी भागातील शाळा देखील सुरु करण्यात येतील. याबाबत शिक्षण विभागाकडून परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

- वर्षा गायकवाड, शालेय शिक्षणमंत्री

Post a Comment

0 Comments