कर्मयोगी इंजिनिरिंग कॉलेज मध्ये पालक मेळावा 2021 उत्साहात संपन्न


 
पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंजिनिरिंग कॉलेज मध्ये रविवार दि. 04 जुलै 2021 रोजी इलेक्ट्रॉनिक्स

अँड टेलिकम्युनिकेशन विभागा तर्फे घेण्यात आलेला पालक मेळावा 2021 उत्साहात संपन्न झाल्याची माहिती

पांडुरंग प्रतिष्ठान चे ट्रस्टी श्री. रोहन परिचारक व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील यांनी दिली.

कोरोंनाच्या महामारी मुळे सदर चा पालक मेळावा हा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आला.

प्रास्ताविक करताना इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन चे विभाग

प्रमुख प्रा. धनंजय शिवपूजे यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलि.विभागाचा मागील तीन वर्षाचा आढावा पालकांसमोर

सादर केला. या तीन वर्षातील विद्यार्थ्यांचा शिक्षणातील चढता आलेख पाहून उपस्थित पालकांनी समाधान

व्यक्त केले.

    ..........................

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    "पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ................................

यावेळी महाविद्यालचे उपप्राचार्य श्री. जगदीश मुडेगावकर व रिसर्च अँड डेवलपमेंट चे अधिष्ठाता डॉक्टर अभय

उत्पात यांनी पालक सभा घेण्यामागचा उद्देश उपस्थित पालकांना सांगितला.

पालक प्रतींनिधी श्री. जयवंतराव जगताप म्हणाले की कोरोंनाच्या महामारीच्या

काळामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोलेज ने ऑनलाइन पद्धतीने जी तज्ञांची

व्याख्याने, विविध विषयावर कार्यशाळा, सेमिनार्स, विविध स्पर्धाचे आयोजन केले होते त्याचे विशेष कौतुक केले

व त्यासाठी त्यांनी संस्थेचे आभार ही मानले.


या पालक सभेवेळी पालक सौ.मंजिरी जोशी, श्री.जावेद सययद, श्री.फैयाझ तांबोळी, सौ.कुलकर्णी, सौ.मलशेट्टी,

सौ.कांबळे, सौ.लोखंडे आदी पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली.

तसेच यावेळी विविध पालकांनी कॉलेज च्या सोयी सुविधा व विद्यार्थ्यांची

प्रगति, संस्थेने पालकना वेळोवेळी केलेले सहकार्य, निकलाची उत्कृष्ट परंपरा, प्लेसमेंट, अत्याधुनिक लॅब, हॉस्टेल

आणि शिस्त या बद्दल विशेष समाधान व्यक्त केले. सदर च्या पालक सभेला शंभरहून अधिक पालक उपस्थित

होते.


यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस पी पाटील म्हणाले की विद्यार्थी व पालकांच्या सूचना या

संस्थेच्या विकासकारिता खूप महत्वाच्या असतात. पालकांच्या सूचना आमलात आणून विद्यार्थ्यांचा विकास

साधता येणे शक्य होते असे सांगून त्यांनी पालकांच्या विविध शंकांचे निरसन ही केले.

सदर पालक सभेसाठी प्रा. रूबाना शेख व प्रा. प्राजक्ता जाधव यांनी समन्वयक म्हणून काम पहिले. कार्यक्रम

पार पाडण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे

सूत्रसंचालन प्रा.सुशील कुलकर्णी यांनी केले. प्रा.रूबाना शेख यांनी आभार मानून पालक सभेची सांगता केली.

Post a Comment

0 Comments