परळी वैजनाथ, (प्रतिनिधी) :-*
पुण्यात राहुन सामाजिक संवेदना जपणाऱ्या परळीच्या अनिलकुमार गित्ते यांची पुणे जिल्हा जॉइंट सेक्रेटरी ( अँटी करप्शन विंग) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशनची ही विंग आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अनिलकुमार गित्ते यांची इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशन, पुणे जिल्हा जॉइंट सेक्रेटरी ( अँटी करप्शन विंग) पदी नियुक्ती झाली. अनिलकुमार गित्ते (9767341444) हे परळीचे भुमीपुत्र असुन कोरोना काळात पुण्यात त्यांनी सामाजिक संवेदना जप्त मोठे सामाजिक काम उभे केले. पुण्यात स्पर्धा परीक्षा तयारीसाठी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत भोजन व्यवस्था असो की गावी जाण्यासाठी मोफत बससेवा उपलब्ध करुन देणे तसेच कोरोनाच्या काळातही त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले असे अनेक मोठे योगदान त्यांनी सामाजिक कार्यात दिले आहे.या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांची इंटरनॅशनल ह्युमन राईट्स असोसिएशन, पुणे जिल्हा जॉइंट सेक्रेटरी ( अँटी करप्शन विंग) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ह्यूमन राईट्स असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष श्री डॉ अविनाश भाऊ सकुंडे, किशोर घोळवे ( राष्ट्रीय उपाध्यक्ष) यांनी नुकतेच त्यांना नियुक्ती पत्र प्रदान केले.या निवडीबद्दल त्यांचे परळीसह पुणे व सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
..........................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
................................
0 Comments