Pandharpur Live Online: बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळखला जाणारा सुपरस्टार आमीर खान पुन्हा एकदा घटस्फोटामुळे चर्चेत आला आहे. पहिली पत्नी रीना दत्ताला घटस्फोट दिल्यानंतर आमिरने किरण रावशी लग्न केले. आता 15 वर्षानंतर त्याने किरणलाही घटस्फोट दिला आहे. एक काळ असा होता की आमिर पहिली पत्नी रीनाच्या प्रेमात वेडा झाला होता.
त्याहूनही धक्कादायक बातमी म्हणजे आमिर आणि किरणच्या घटस्फोटानंतर आता अभिनेत्री फातिमा सना शेख आमीर खानची सहकलाकार सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
त्यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. किंबहुना किरण राव आणि आमीर खानने घटस्फोट घेतल्याचे कारण म्हणजे फातिमा सना शेख यांची जवळीक असल्याचे बोलले जात आहे.
...........................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
..................................
सोशल मीडियात चाहत्यांकडून याबाबतीत अनेक अनुमान लावले जात आहेत. 'दंगल' चित्रपटात आमिर खान आणि फातिमा सना शेख यांनी एकत्र काम केले होते. हा फातिमाचा पहिला चित्रपट होता आणि तिने आमिर खानच्या मुलीची भूमिका केली होती.
समोर आलेल्या बातम्यांनुसार २०१६ मध्ये दंगलच्या चित्रिकरणादरम्यान आमीर आणि फातिमा यांच्यात जवळीक वाढल्याचे बोलले जात होते. दोघांना अनेकवेळा एकमेकांच्या हातात हात घालून जातानाही पाहण्यात आले. आमीर फातीमाला घेऊनच पार्टी किंवा गेट टुगेदरला जात होता. त्यामुळे अफवांना उत आला होता.
मात्र, या अफवांना आणखी बळ मिळाले ते आमीर खानने दिलेल्या प्रस्तावामुळे. ठग्ज ऑफ हिंदुस्थानसाठी अमिताभ आणि कॅटरिना कैफसोबत आमीरने फातिमाच्या नावाच्या प्रस्ताव ठेवला होता. फातीमाच्या भूमिकेवर आमीरने विशेष लक्ष केंद्रित केले होते. त्याच्या या वागण्यामुळे कॅटरिनाची डोकेदुखी वाढली होती.
इतकेच नाही, तर कॅटरिना आणि फातिमामध्ये टेन्शन वाढल्याची सुद्धा चर्चा रंगली होती. त्यामुळे किरण राव चांगलीच नाराज झाली होती. या सगळ्या प्रकरावर आमीरने प्रतिक्रिया दिली नाही. दुसरीकडे फातीमाकडे याकडे दुर्लक्ष करत प्रतिक्रिया देण्याचे टाळले होते. मात्र, त्यांच्या फोटोंनी नेहमीच चर्चांना वाव दिला आहे.
0 Comments