पोलिसांसाठी खुशखबर! पोलीस शिपाई सुध्दा होणार पीएसआय ; गृहमंत्री वळसे- पाटील यांची माहिती


Pandharpur Live Online: पोलीस दलात शिपाई असताना त्यानंतर निवृत्त होईपर्यंत पीएसआय पदापर्यंत जाता येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील सादर करणार आहेत. याबाबत त्यांनी आपल्या ट्विटरवरून माहिती दिली आहे.

पोलीस दलात शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्यांना निवृत्त होताना पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावं, यासाठी गृहविभागातर्फे प्रस्ताव तयार करण्यात येत आहे. पावसाळी अधिवेशनानंतर याबाबत मंत्रालयात बैठक घेऊन निर्णय घेणार आहे, असं दिलीप वळसे-पाटील यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

...........................

ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

https://youtube.com/c/PandharpurLive

''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

Mail: livepandharpur@gmail.com

     ..................................

आतापर्यंत संबंधित पदाची संख्या, आरक्षण, पात्रता असे निकष प्रमोशनसाठी लागू होतात.

मात्र आता हे निकष तर असतीलच पण त्यासोबत या प्रस्तावानुसार तरूण एक शिपाई म्हणून जरी पोलीस खात्यात भरती झाला तर त्याला पोलीस उपनिरीक्षक पदापर्यंत पोहोचता यावं, यासाठी गृृहविभाग खातं प्रस्ताव तयार करत आहे.

दरम्यान, येेत्या 5 आणि 6 तारखेला अधिवेशन असणार आहे. आधीच अधिवेशनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी सुरू असलेली पाहायला मिळत आहे. या अधिवेशनानंतर गृहविभाग या प्रस्तावाबाबत निर्णय घेणार आहे. जर या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर पोलीस खात्यातील हा महत्त्वाचा निर्णय ठरणार आहे.


Post a Comment

0 Comments