संबंधित व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं असून गावकऱ्यांनी शिक्षकाच्या या कृत्याचा निषेध केला आहे. संबंधित घटना ही नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरनजीक असणाऱ्या दापूरे गावातील आहे. तर संबंधित शिक्षक दापूरे गावातील ग्रामपंचायतीच्या शाळेत शिकवण्याचं काम करतो. सध्या लॉकडाऊन असल्यानं शाळा बंद आहे, अशात या शिक्षकानं शाळेलाच आपले दारुचा अड्डा बनवला आहे.
संबंधित मद्यधुंद शिक्षकाला आपण कुठे आहोत? आणि काय करत आहोत याचं देखील भान उरलं नाही. गावातील काही नागरिकांनी संबंधित मद्यधुंद शिक्षकाची कानउघडणी केली आहे. पण त्याची नशा उतरेपर्यंत शिक्षकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल झाला आहे.
.........................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
................................

0 Comments