उद्या होणार मोदी सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार ; २२ जणांना मंत्रीपदाची शपथ दिली जाण्याची शक्यता


 
Pandharpur Live Online:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा बुधवारी विस्तार होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सकाळी 11 वाजता होणाऱया मंत्रिमंडळ विस्तारात 17-22 खासदारांना मंत्रीपदाची शपथ दिली जाणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत गेल्या दोन दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपचे संघटन महामंत्री बी.एल. संतोष यांच्यामध्ये बैठका सुरू आहेत.

केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या 28 मंत्रीपदे रिक्त आहेत. त्यामुळेच सरकारने मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू केल्या असून यामध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेशातील खासदारांची वर्णी लागणार असल्याचे दिसत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील भाजप खासदार हिना गावित यांच्याबरोबरच पूनम महाजन, प्रीतम मुंडे, भूपेंद्र यादव, नारायण राणे यांच्या नावाची चर्चा आहे. मध्य प्रदेशमधून ज्योतिरादित्य सिंधिया, राकेश सिंह यांच्यासह अन्य दोन खासदारांची नावे मंत्रिमंडळ विस्तारात आघाडीवर आहेत. बिहारमधून लोकजनशक्ती पार्टीचे खासदार पशुपती कुमार पारस, जेडीयुचे आरसीपी सिंह, भाजपचे सुशील मोदी तर उत्तर प्रदेशमधील अपना दलच्या अनुप्रिया पटेल, वरुण गांधी, रामशंकर कठेरिया, अनिल जैन, रिटा बहुगुणा, जाफर इस्लाम यांच्या नावाची चर्चा आहे. याशिवाय लडाखचे खासदार जामयांग नामग्याल, उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री तिरथसिंह रावत, अजय भट, अनिल बलुनी, कर्नाटकचे प्रताप सिंह, पश्चिम बंगालमधून जगन्नाथ सरकार, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांच्याही नावाची मंत्रीपदासाठी चर्चा आहे.

    .........................

    ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा

    "पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.

    https://youtube.com/c/PandharpurLive

    ''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live

    संपर्क:  Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165

    Mail: livepandharpur@gmail.com

         ................................

थावरचंद गेहलोत यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळात सध्या मध्य प्रदेशातील नरेंद्र सिंग तोमर, प्रल्हाद पटेल, थावरचंद गेहलोत आणि फगन कुलस्ते हे चौघे मंत्रिमंडळात आहेत. यापैकी थावरचंद यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. ते 73 वर्षांचे असून 2014 पासून मोदी सरकारमध्ये मंत्री म्हणून कार्यरत आहेत.

Post a Comment

0 Comments