कोर्टी, पंढरपूर: संपूर्ण देशाला नव्हे तर संपूर्ण विश्वाला कोरोना रोगाने फक्त त्रस्तच नव्हे तर अनेक परिवारांना अक्षरशः उध्वस्त केले. अशा अतिशय वाईट व धोकादायक परिस्थितीत अखंड व कायम सेवेत राहून असंख्य रूग्णांना जीवनदान देणा-या देशातील असंख्य देवदूत अर्थात डॉक्टर व आरोग्य सेवक यांचा सन्मान करणे ही देशातील प्रत्येक नागरिकाची एक सामाजिक जाणीव या भूमिकेतून जबाबदारी आहे.
ही सामाजिक जाणिव व जबाबदारी पूर्ण करण्यासाठी नेहमीच एक पाऊल पुढे टाकणारी संस्था सिंहगड पब्लिक स्कूल कोर्टी पंढरपूर यांनी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने गादेगाव येथील आरोग्य केंद्रावर जाऊन सर्व आरोग्य कर्मचारी यांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान केला.
यावेळी आरोग्य विभागप्रमुख डॉ. अनिसा तांबोळी, श्री. सुभाष तनमोर व त्यांचा सर्व कर्मचारी परिवार उपस्थित होता. सिंहगड पब्लिक स्कूल च्या प्राचार्या स्मिता नवले, मुख्याध्यापिका स्मिथा नायर यांनी हा सत्कार करून आभार व्यक्त केले.
............................
ताज्या घडामोडी पहाण्यासाठी लगेच सबस्क्राईब करा
"पंढरपूर लाईव्ह" चे युट्युब चॅनल आणि बेलचे आयकॉन दाबा.
https://youtube.com/c/PandharpurLive
''जनसामान्यांच्या मनाचा आरसा'' @Pandharpur Live
संपर्क: Whatsup : 8308838111, 7972287368, 7083980165
Mail: livepandharpur@gmail.com
..................................
0 Comments