Pandharpur Live Video News Updates

..............................
.....................

......................
Pandharpur Live Online: आठ लाखांच्या लाच प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी शिक्षणाधिकारी वैशाली वीर-झनकर यांचा जामीन अर्ज आज (14 ऑगस्ट) पुन्हा नाशिक जिल्हा न्यायालयाने फेटाळला. तसेच जामीन अर्ज फेटाळत अधिक चौकशी करण्यासाठी त्यांच्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ करण्यात आलीय. ठाणे लाचलुचपत विभागाने अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर न्यायालयाने कोठडी वाढवण्याचा निकाल दिला. झनकर यांना आणखी दोन दिवस पोलीस कोठडी
शिक्षण संस्थेच्या सरकारी अनुदानला मंजुरी देण्यासाठी 8 लाख रुपये लाच घेताना पकडल्या गेलेल्या नाशिकच्या शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या जानिमाचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. तसेच ठाणे लाचलुचपत विभागाची अधिक चौकशीसाठी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायालयाने झनकर यांना आणखी दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा निर्णय दिलाय. तसेच या प्रकरणातील दोन संशयित आरोपी चालक ज्ञानेश्वर येवले आणि प्राथमिक शिक्षक पंकज दशपुते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यांच्या जामीन अर्जचा प्रस्ताव अद्यापही प्रलंबितआहे.

शिक्षक संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या 20 टक्के अनुदानातून नियमित वेतन करण्याचे आदेश देण्याच्या मोबदल्यात शिक्षणाधिकारी वैशाली वीर यांनी 8 लाख रुपयांची लाच मागितली होती. शासकीय वाहन चालकाच्या माध्यामातून ही लाच स्वीकारताना नाशिक जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर-झनकर यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. शिक्षण विभागातील मोठ्या पदावरील अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकल्यानंतर जिल्हा परिषदेत चर्चेला उधाण आलंय. झनकर यांच्यासह यात वाहन चालक आणि एका प्राथमिक शिक्षकाचा सहभाग आहे.

आरोपी शिक्षणाधिकाऱ्यांनी एका संस्था चालकांकडे सरकारकडून मिळणारं 20 टक्के अनुदान मंजूर करण्यासाठी ही लाच मागितली होती. संस्था मंजूर झालेल्या अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरु करण्याच्या ऑर्डरची मागणी करत होती. ही ऑर्डर करण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी संस्थेकडून सुमारे 9 लाख रुपयांची लाच मागितली. यावेळी तक्रारदारांनी तडजोडीअंती 8 लाख रुपये देण्याचे कबूल केले. मंगळवारी (10 ऑगस्ट) सायंकाळी साडेपाचला ठाणे विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने झनकर यांना अटक केली होती.

0 Comments