प्रतीकात्मक छायाचित्र


चीनच्या वायव्येकडील तुर्पन हाम बसिन भागामध्ये हे अवशेष सापडले आहेत. या भागात डायनॉसॉरचे अवशेष यापूर्वीही सापडले आहेत. मात्र पृष्ठवंशीय डायनॉसॉरचे अवशेष पहिल्यांदाच सापडले आहेत. 'चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेस' आणि ब्राझीलच्या राष्ट्रीय संग्रहालयातील संशोधकांचे निष्कर्ष या आठवड्यात गुरुवारी 'सायंटिफिक रिपोर्टस' मध्ये प्रकाशित झाले आहेत.
एकूण 3 डायनॉसॉरचे अवशेष काही खडकांमधील जीवाश्मांमध्ये सापडले आहेत. एकमेकांपासून 2 ते 5 किलोमीटर अंतरावर हे जीवाश्म सापडले आहेत. यापैकी एका जीवाश्मांना संशोधकांनी 'सिल्युटिटान सिनेनसीस' असे नाव दिले आहे. मंडारीन भाषेमध्ये याचा अर्थ सिल्क रोड असा आहे. तर दुसऱ्याला 'हॅमिटिटान शिन्जियांजेनेसिस' असे नाव दिले गेले आहे. याचा अर्थ शिंजियांग प्रांतात सापडलेल जीवाश्म असे आहे.
यातील सिल्युटिटान हा जीवाश्म तब्बल 70 फूट लांबीचा आहे. तर हॅमिटिटान 56 फूट लांबीचा आहे. गेल्या काही दशकांमध्ये चीनमध्ये सापडलेले हे सर्वात मोठे डायनॉसॉरचे जीवाश्म आहेत. या डायनॉसॉरचा आकार अतिविशाल व्हेल माशांच्या आकाराइतका असल्याचे मानले जात आहे.
0 Comments