धक्कादायक ... 25 वर्षीय आरोपीची पोलीस कोठडीत आत्महत्या!


 Pandharpur Live Online: एका 25 वर्षीय तरुणाने पोलीस ठाण्यात आत्महत्या  केल्याचा प्रकार समोर आला आहे. अमरावती शहरातील राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये  हा प्रकार घडला आहे. या तरुणावर अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा आरोप होता आणि त्या प्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली होती. अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याच्या गुन्ह्यातील 25 वर्षीय आरोपीने अमरावती शहरातील राजापेठ पोलीस ठाण्याच्या पोलीस कोठडीत आत्महत्या केली आहे. शर्टच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.


अल्पवयीन युवतीस फूस लावून पळवून आणि बलात्काराच्या प्रकरणात अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.

4 ऑगस्ट रोजी अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्याची फेजरपुरा पोलीस ठाण्यात मुलीच्या आईने तक्रार दाखल केली होती. यावेळी फ्रेजरपुरा पोलिसांनी वर्धा जिल्ह्यातील आष्टी येथील सागर ठाकरेवर गुन्हा दाखल केला. 17 ऑगस्ट रोजी सागर ठाकरे आणि अल्पवयीन मुलगी दोघेही फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये स्वत: आले आणि यावेळी सागरला अटक करण्यात आली.

तर मुलीला आईच्या स्वाधीन करण्यात आले. आरोपी सागर ठाकरे याला 18 तारखेला अमरावती न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयाने 20 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली. सागर पोलीस कोठडीत असताना आज 19 ऑगस्ट रोजी सकाळी त्याने आपल्या शर्टाने गळफास घेवून आत्महत्या केली. पोलीस वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली असून पोलिसांचे पोलीस ठाण्यात दुर्लक्ष असल्याने आता अमरावती पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

Post a Comment

0 Comments