नैराश्याने केला घात! ''..पण मला कदाचित जगता आलं नाही मी माझ्या चुकीमुळे जगलो नाही... '' तरुणाची आत्महत्येपूर्वी फेसबुक पोस्ट आणि लगेच घेतली धावत्या एसटी बससमोर उडी!


 
Pandharpur Live Online: फेसबुकवर वैयक्तिक आयुष्यात त्रास असल्याची पोस्ट टाकत अखिल भारतीय छावा संघटनेच्या पैठण तालुक्यातील युवक तालुका अध्यक्षाने एसटी बससमोर उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना ही काल (17 ऑगस्ट) रात्री नेवासा-नगर महामार्गावरील वाघाडी गावाजवळ घडली. या घटनेमुळे पैठण तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. महेश पाटील शिंदे असे आत्महत्या करणाऱ्या ‘छावा’च्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे.

वैयक्तिक आयुष्याला कंटाळलेल्या एका तरुणानं फेसबूकवर (Facebook Post) पोस्ट करत आत्महत्या केली आहे. पैठण (Paithan) तालुक्यातल्या अमरापूर वाघूडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. अखिल भारतीय छावा युवक संघटनेच्या पैठण तालुका युवक अध्यक्षानं एसटी बस (ST Bus) समोर येऊन उडी मारुन आत्महत्या (Suicide) केली आहे. महेश शिंदे पाटील असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मंगळवारी रात्री नेवासा- नगर महामार्गावरील कांगोणी फाट्याजवळ त्यानं आपली जीवनयात्रा संपवली आहे.

महेश गेल्या अनेक दिवसांपासून तणावात होता. अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून तालुका युवक अध्यक्षपदावर महेश काम करत होता.



फेसबूकवर पोस्ट टाकून महेश आत्महत्या करत असल्याची माहिती दिली. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरू नका अशी फेसबुकवर पोस्ट केली. पोस्ट टाकल्यानंतर त्याचे मित्र, जवळील नातेवाईक अशा अनेकांनी त्याला कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानं आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईल बंद करुन ठेवला होता. त्याच्या पोस्टवर बऱ्याच जणांनी कमेंट करुन असं टोकाचं पाऊल उचलू नकोस, अशी विनवणी केली. मात्र तोवर महेशनं धक्कादायक पाऊल उचललं होतं.


महेश अनेक दिवसांपासून तणावात

गेल्या काही दिवसांपासून महेश हा तणावात होता. मात्र कोणत्या कारणाने तो तणावात होता, हे त्याने कुणालाही सांगितले नाही. मंगळवारी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास त्याने फेसबुकवर आयुष्यात खूप त्रास आहे. माझ्या मृत्यूला कुणालाही जबाबदार धरु नका, अशी पोस्ट टाकली. त्यानंतर काही वेळातच त्याने अहमदनगर-नेवासा मार्गावरील वाघाडी गावाजवळ दुचाकी बाजूला उभी करुन भरधाव जाणाऱ्या एसटी बससमोर उडी घेत आत्महत्या केली.

जखमी महेशला नागरिकांनी रुग्णालयात नेलं, पण…

महेश अचानक बसखाली आल्याने बस चालकही काही करु शकला नाही. महेश या घटनेत प्रचंड जखमी झाला. त्याला परिसरातील नागरिकांनी तातडीने नेवासा येथील रुग्णालयात दाखल केलं. पण तो गंभीर जखमी झाला होता. याशिवाय अतिरक्तस्त्रावामुळे महेशची प्राणज्योत मालवली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महेशला मृत घोषित केलं. त्याचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी पैठण जवळील त्याच्या मूळ गावी त्याच्या पार्थिवावर अंत्यविधी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments